नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील ‘जीएस ३’ या पेपरमधील तंत्रज्ञान हा घटक आपण समजून घेणार आहोत. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात तंत्रज्ञानातील जटिलता समजून त्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर व त्यातून निर्माण होणार्‍या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता निर्माण करणे अपेक्षित आहे. सध्याच्या काळातील सर्व क्षेत्रातील चर्चेतील नवनवे तंत्रज्ञान आपण समजून घ्यायला हवे. मुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न हे यानुसारच विचारले जातात.

आयोगाने यासाठी दिलेला अभ्यासक्रम

’    विज्ञान व तंत्रज्ञान – घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम.

’    विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.

’    माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित समस्या.

’    २०२५ च्या मुख्य परीक्षेत यावर खालीलप्रमाणे ५० गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत. 

भारतातील फ्युजन ऊर्जा कार्यक्रम गेल्या काही दशकांत सातत्याने विकसित झाला आहे. ‘इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर’ या आंतरराष्ट्रीय फ्युजन ऊर्जा प्रकल्पातील भारताच्या योगदानाचा उल्लेख करा. या प्रकल्पाच्या यशामुळे जागतिक ऊर्जेच्या भविष्यावर काय परिणाम होतील? १० (१५० शब्दांत उत्तर द्या)

२०४७ पर्यंत स्वच्छ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत ऊर्जा-स्वातंत्र्य कसे साध्य करू शकेल? या प्रयत्नात जैवतंत्रज्ञान कोणती महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल? १० (१५० शब्दांत उत्तर द्या)

नॅनोतंत्रज्ञान कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती कशी घडवून आणते? हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांचा सामाजिक-आर्थिक दर्जा उंचावण्यास कशी मदत करू शकेल? १५ (२५० शब्दांत उत्तर द्या)

भारत सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे. भारतातील सेमीकंडक्टर उद्योगासमोरील आव्हाने

कोणती आहेत? ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ची प्रमुख वैशिष्ट्ये नमूद करा. (२५० शब्दांत उत्तर द्या) १५

वरीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर पाहू –

भारत सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनण्याचे उद्दिष्ट ठेवून

आहे. भारतातील सेमीकंडक्टर उद्योगासमोरील आव्हाने कोणती आहेत? ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ची प्रमुख वैशिष्ट्ये  नमूद करा. (२५० शब्दांत उत्तर द्या) १५

सेमीकंडक्टर हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स, धोरणात्मक स्वायत्तता आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक आहेत. भारताकडे जगातील चिप डिझाइन मनुष्यबळापैकी सुमारे २०% मनुष्यबळ असले, तरी देशांतर्गत व्यावसायिक फॅब्रिकेशन आणि पॅकेजिंग युनिट्स उभारण्यात विशिष्ट संरचनात्मक आव्हाने आहेत.

उद्योगासमोरील आव्हाने

’    प्रचंड भांडवल आणि दीर्घ कालावधी : सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारण्यासाठी

३ ते १० अब्ज डॉलर्सचे प्राथमिक भांडवल, ३ ते ५ वर्षांचा उभारणी कालावधी आणि तंत्रज्ञान वेगाने कालबाह्य होण्याचा धोका असतो.

’    पायाभूत सुविधांची आवश्यकता : फॅब्सना दररोज लाखो लिटर अति-शुद्ध पाणी, अखंडित उच्च दर्जाचा वीजपुरवठा आणि कंपन-मुक्त वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता असते.

’    पुरवठा साखळी आणि कच्च्या मालावरील अवलंबित्व :

उच्च-शुद्धतेची रसायने, विशिष्ट वायू, सिलिकॉन वेफर्स आणि महत्त्वपूर्ण लिथोग्राफी उपकरणे यांसाठी आयातीवर मोठे अवलंबित्व आहे.

’    फॅब्रिकेशन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची कमतरता : चिप डिझाइन आणि सॉफ्टवेअरमध्ये आघाडीवर असूनही, भारताकडे प्रत्यक्ष सेमीकंडक्टर उत्पादन, क्लिनरूम देखभाल आणि केमिकल प्रोसेस इंजिनिअरिंगमधील सखोल व्यावसायिक कौशल्याची कमतरता आहे.

’    जागतिक स्पर्धा : यूएस चिप्स ॲक्ट, ईयू चिप्स ॲक्ट आणि पूर्व आशियाई देशांद्वारे दिल्या जाणार्‍या भरघोस अनुदानांमुळे जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यात तीव्र स्पर्धा निर्माण होते.

इंडिया सेमीकंडक्टर मिशनची ठळक वैशिष्ट्ये

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयांतर्गत ” ७६,००० कोटी (सुमारे द्द्र १० अब्ज) खर्चासह सुरू करण्यात आलेले इंडिया सेमीकंडक्टर मिशन हे एक शाश्वत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले परिसंस्था तयार करण्यासाठी समर्पित नोडल एजन्सी म्हणून कार्य करते:

’    फॅब्ससाठी आर्थिक सहाय्य : सिलिकॉन सेमीकंडक्टर फॅब्स आणि डिस्प्ले फॅब्स उभारण्यासाठी सर्व टेक्नॉलॉजी नोड्सवर प्रकल्प खर्चाच्या ५०% आर्थिक सहाय्य समान आधारावर प्रदान करते.

’    पॅकेजिंग आणि स्पेशॅलिटी क्षेत्राला पाठबळ : कंपाउंड सेमीकंडक्टर्स, सिलिकॉन फोटोनिक्स, सेन्सर्स आणि असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग युनिट्स उभारण्यासाठी भांडवली खर्चाच्या ५०% आर्थिक सहाय्य देते.

’    डिझाइन लिंक्ड इन्सेंटीव्ह योजना : देशांतर्गत कंपन्या आणि स्टार्टअप्ससाठी पात्र खर्चाच्या ५०% पर्यंत आर्थिक प्रोत्साहन आणि डिझाइन पायाभूत सुविधा पुरवते.

’    सेमी-कंडक्टर लॅबोरेटरीचे आधुनिकीकरण : मोहाली येथील सरकारी सेमी-कंडक्टर लॅबोरेटरीचे संशोधन आणि विकास तसेच व्यावसायिक उत्पादनाच्या क्षमतेसाठी आधुनिकीकरण करण्यावर भर देते.

’    प्रतिभा विकास : व्हीएलएसआय आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञानामध्ये ८५,००० हून अधिक उद्योग-सज्ज अभियंते प्रशिक्षित करण्यासाठी शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी.

आर्थिक अनुदाने, डिझाइन प्रोत्साहन आणि कौशल्य उपक्रमांचा समन्वय साधून, भारताला केवळ चिप डिझाइन वापरकर्त्याकडून एका सक्षम जागतिक उत्पादन केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचे इंडिया सेमीकंडक्टर मिशन चे उद्दिष्ट आहे.

आगामी मुख्य परीक्षेसाठी पुढील तंत्रज्ञान अभ्यासा

’    कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनरेटिव्ह एआय

’    सेमीकंडक्टर्स आणि

चिप तंत्रज्ञान

’    क्वांटम तंत्रज्ञान

’    अंतराळ तंत्रज्ञान

’    हरित हायड्रोजन तंत्रज्ञान

’    जैवतंत्रज्ञान आणि

जनुक संपादन

’    अक्षय ऊर्जा साठवणूक

’    ६जी आणि प्रगत

संप्रेषण तंत्रज्ञान

’    ड्रोन्स आणि स्वायत्त प्रणाली

’    कार्बन कॅप्चर,

युटिलायझेशन आणि स्टोरेज  वरील अपेक्षित घटकांवर एक नोट तयार करा. त्यानुसार अपेक्षित प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव करा.