अंतराळ तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा व आण्विक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, आरोग्य आणि आजार, पर्यावरण-तंत्रज्ञान इ. घटकांवर नियमितपणे प्रश्न विचारले जातात. २०१३ ते २०२५ मध्ये यूपीएससी पूर्वपरीक्षेत ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयातील वारंवार विचारलेले घटक आपण जाणून घेणार आहोत. २०२६ च्या पूर्वपरीक्षेसाठी आपण या घटकांचा सर्वाधिक अपेक्षित घटक म्हणून अभ्यास करणे अपेक्षित आहे. हे घटक खालीलप्रमाणे आहेत –

१. अंतराळ तंत्रज्ञान

  • इस्रोच्या मोहिमा : चांद्रयान, आदित्य-एल१, गगनयान.
  • उपग्रह : (संपर्क, नेव्हिगेशन – नाविक).
  • प्रक्षेपक : पीएसएलव्ही विरुद्ध जीएसएलव्ही.
  • अंतराळ संस्था : इस्रो, नासा यांची मूलभूत माहिती व त्यांच्या उपक्रमांची माहिती.

यातील प्रश्न हे पूर्णपणे चालू घडामोडींवर आधारित असते.

२. जैवतंत्रज्ञान

  • डीएनए, आरएनए ची मूलभूत माहिती.
  • क्रिसपर जीन एडिटिंग.
  • एम-आरएनए लसी.
  • स्टेम सेल्स.
  • जीएम पिके (जनुकीय बदललेली पिके).

यावरील प्रश्न हे संकल्पना व त्यांच्या उपयोजनावर आधारित प्रश्न असतात.

३. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगची मूलभूत माहिती.
  • ब्लॉकचेन.
  • क्वांटम कॉम्प्युटिंग.
  • इंटरनेट ऑफ थिंग्ज.

कृत्रिम बुद्धिमत्ता या घटकाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. व यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप अधिक असणार आहे.

४. ऊर्जा आणि आण्विक तंत्रज्ञान

  • अणुविखंडन (फिजन) विरुद्ध अणुसंलयन (फ्यूजन).
  • अणुभट्ट्या.
  • ग्रीन हायड्रोजन.
  • नूतनीकरणक्षम ऊर्जा तंत्रज्ञान.

५. संगणक आणि दळणवळण

  • 5जी/6जी तंत्रज्ञान.
  • सायबर सुरक्षा.
  • क्लाउड कॉम्प्युटिंग.
  • इंटरनेट प्रोटोकॉल्स.

६. आरोग्य आणि आजार

  • विषाणू विरुद्ध जीवाणू.
  • लस आणि रोगप्रतिकारशक्ती.
  • झुनोटिक रोग.
  • अँटीबायोटिक रेझिस्टन्स.

७. नॅनो-तंत्रज्ञान आणि साहित्य

  • नॅनो-कण.
  • ग्राफीन.
  • स्मार्ट मटेरिअल्स.

८. संरक्षण तंत्रज्ञान

  • क्षेपणास्त्रे (अग्नी, पृथ्वी, ब्राह्मोस).
  • ड्रोन व युएव्ही.
  • अँटी-सॅटेलाइट शस्त्रे.

९. पर्यावरण तंत्रज्ञान

  • कार्बन कॅप्चर.
  • बायोरेमेडिएशन.
  • इलेक्ट्रिक वाहने.
  • कचरा व्यवस्थापन.

१०. इतर महत्त्वाचे विभाग

  • सेमीकंडक्टर आणि चिप्स.
  • लेझर तंत्रज्ञान.
  • जीपीएस व नाविक.
  • ३डी प्रिंटिंग.

‘विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयातील पूर्व परीक्षेसाठीचे महत्त्वाचे १५ घटक

  1. गगनयान मोहीम
  2. क्रिस्पर तंत्रज्ञान
  3. एम-आरएनए लस
  4. क्वांटम कॉम्प्युटिंग
  5. ब्लॉकचेन
  6. ग्रीन हायड्रोजन
  7. न्यूक्लियर फ्यूजन
  8. ५जी तंत्रज्ञान
  9. अँटीबायोटिक रेझिस्टन्स
  10. नॅनो-तंत्रज्ञान
  11. ड्रोन
  12. कार्बन कॅप्चर
  13. ईव्ही बॅटरी
  14. सेमीकंडक्टर चिप्स
  15. नाविक

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची तयारी करताना अभ्यासाची रणनीती

१. मूलभूत पाया

तांत्रिक विषयात जाण्यापूर्वी पाया मजबूत करणे आवश्यक आहे.

एनसीईआरटी इयत्ता ६ वी ते १० वी : जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील मूलभूत संकल्पना समजून घ्या. प्रकाशाचे गुणधर्म, पेशींची रचना, मानवी शरीर संस्था, आणि ऊर्जेचे प्रकार यांचा अभ्यास चांगला करा.

टीप : खूप खोलवर तांत्रिक तपशीलात जाण्याऐवजी संकल्पनांचा दैनंदिन जीवनातील वापर समजून घेण्यावर भर द्या.

२. चालू घडामोडींवर आधारित अभ्यास

यूपीएससी पूर्व परीक्षेत तंत्रज्ञानावर आधारित प्रश्न हे गेल्या २ वर्षातील चालू घडामोडींवर विचारले जातात. यासाठी महत्त्वाचे स्रोत म्हणजे ‘द हिंदू’ किंवा ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रातील ‘विज्ञान व तंत्रज्ञानाची’ पाने होय. अंतराळ मोहिमा, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊर्जा यासंबंधीच्या चालू घडामोडींवर विशेष लक्ष्य देणे अपेक्षित आहे.

३. ‘हाय-इम्पॅक्ट’ तंत्रज्ञानावर खालीलप्रमाणे संक्षिप्त नोट्स तयार करा

  • क्रिस्पर-कॅस९ : जीन एडिटिंग कसे कार्य करते?
  • एम-आरएनए लस : पारंपारिक लसींपेक्षा ही वेगळी कशी आहे?
  • ५जी तंत्रज्ञान : त्याचे फायदे आणि लॅटन्सी.
  • ग्रीन हायड्रोजन : निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरणास होणारा फायदा.

४. मागील वर्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण

  • कल ओळखा : आयोगाद्वारे प्रश्न विधानांच्या स्वरूपात विचारले जातात.

एखादे तंत्रज्ञान प्रत्यक्ष जीवनात कसे वापरले जाते, यावर आयोगाचा जास्त भर असतो.

उदा. जर प्रश्न ‘ब्लॉकचेन’ वर असेल, तर तो केवळ क्रिप्टोकरन्सीपुरता मर्यादित नसून त्याचा वापर प्रशासनात कसा होऊ शकतो, हे विचारले जाते.

५. एलिमिनेशन तंत्र आणि सराव

  • एलिमिनेशन तंत्र : अपरिचित प्रश्नांमध्ये ‘अतिरेकी’ विधाने (उदा. ओन्ली, ऑलवेज्, नेव्हर) ओळखून चुकीचे पर्याय बाद करायला शिका.
  • रिव्हिजन : विज्ञान हा विषय विसरण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे वारंवार रिव्हिजन करा.
  • संकल्पनात्मक स्पष्टता : तांत्रिक खोलीपेक्षा संकल्पनात्मक स्पष्टता महत्त्वाची आहे, ज्यामुळे उत्तराची अचूकता वाढते.

या पद्धतीने अभ्यास केल्यास कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळवणे शक्य होईल. लक्षात ठेवा पूर्व परीक्षेसाठी अपेक्षित प्रश्नांवर आपण काम करायला हवे. त्यानुसार स्वतःच्या अभ्यासाची रणनीती ठरवून अभ्यास करा.