यूपीएससी पूर्वपरीक्षेत पर्यावरणशास्त्र, जैवविविधता आणि हवामान बदलाच्या मूलभूत संकल्पना आपण समजून घेणे अपेक्षित असते. राष्ट्रीय उद्याने, बायोस्फीअर रिझर्व्ह, रामसर स्थळे, चालू घडामोडींमधील प्रजाती आणि पर्यावरणीय अधिवेशने यावर लक्ष केंद्रित करा. पर्यावरणाला चालू घडामोडींशी जोडा. विशेषतः अहवाल, निर्देशांक आणि शासकीय योजना यावर भर द्या.
ट्रेंड समजून घेण्यासाठी मागील १५ वर्षाच्या प्रश्नांचा सराव करा. अन्न साखळी, पर्यावरणीय पिरॅमिड आणि जैव-रासायनिक चक्र यासारख्या संकल्पना समजून घेताना स्वतःच्या लहान नोट्स बनवा. या नोट्स आपल्याला रिव्हीजन साठी वापरता येतील. अचूकतेसाठी नियमित मॉक टेस्ट आणि मॅपिंग सराव आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. त्यानुसार नियमित सराव करा.
दिवसांचे नियोजन करताना दररोज किमान ४ तास इतका वेळ अभ्यासासाठी दिलेला आहे.
दररोज अभ्यासलेल्या घटकांवर आधारित मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण करा.
पहिला टप्पा – दिवस १–७ : पर्यावरणाच्या मूलभूत संकल्पना
दिवस १–२ :
- पर्यावरणशास्त्र व परिसंस्था– रचना व कार्य
- अन्नसाखळी, अन्नजाळे
- पर्यावरणीय पिरॅमिड
- जैव-भूरासायनिक चक्रे
दिवस ३:
- जैवविविधता आनुवंशिक, प्रजाती व परिसंस्था विविधता
- जैवविविधता हॉटस्पॉट (भारत जग)
- स्थानिक प्रजाती, किस्टोन प्रजाती
दिवस ४:
- आययुसीएन व प्रजाती वर्गीकरण
- आययुसीएन तांबडी यादी
- फ्लॅगशिप प्रजाती व अंब्रेला प्रजाती
- वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या प्रजाती
दिवस ५:
- भारतातील संरक्षित क्षेत्रे
- राष्ट्रीय उद्याने
- वन्यजीव अभयारण्ये
- जैवमंडल राखीव क्षेत्रे
- संरक्षण राखीव क्षेत्र
दिवस ६:
- आंतरराष्ट्रीय करार (बिग ४)
- युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज
- जैविक विविधतेवरील अधिवेशन
- रामसर अधिवेशन (पाणथळ जागांचा करार)
- वन्यजीव आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन
दिवस ७:
रिव्हीजन व टेस्ट
मागील ६ दिवसांत अभ्यासलेल्या घटकांचा अभ्यास
१०० प्रश्नांची मॉक टेस्ट
दुसरा टप्पा – दिवस ८–१४ : हवामान बदल व प्रदूषण
दिवस ८–९:
- हवामान बदल मूलतत्त्वे
- हरितगृह वायू
- जागतिक तापमानवाढ
- कार्बन शोषण
- महासागर अम्लीकरण
या घटकांवर आधारित मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण करा.
दिवस १०:
- हवामान अहवाल
- इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज अहवाल व इतर अहवाल
- कॉप परिषदा
- एनडीसीज्
या घटकांवर आधारित मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण करा.
दिवस ११:
- प्रदूषण वायू, पाणी, माती, ध्वनी प्रदूषण
- हवा गुणवत्ता निर्देशांक (एकयूआय)
- यूट्रोफिकेशन
दिवस १२:
- भारतातील पर्यावरणीय कायदे
- पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६
- वायू अधिनियम १९८१
- जल अधिनियम १९७४
- वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२
दिवस १३:
- संस्था
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ
- राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण इ.
दिवस १४ :
मागील ६ दिवसांत अभ्यासलेल्या घटकांचा अभ्यास
१०० प्रश्नांची मॉक टेस्ट
तिसरा टप्पा – दिवस १५–२१ : भारतीय पर्यावरण व नकाशा सराव
दिवस १५–१६:
भारतातील जैवविविधता
- पश्चिम घाट
- पूर्व हिमालय
- मॅंग्रोव्ह क्षेत्रे
- प्रवाळ भित्ती
दिवस १७:
महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने – त्यांचे स्थान, त्यातील नद्या, त्यातील प्रसिद्ध प्रजाती इ.
- काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (आसाम)
- गीर राष्ट्रीय उद्यान (गुजरात)
- सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (पश्चिम बंगाल)
- जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड) इ.
दिवस १८:
प्राणी प्रजाती संवर्धन प्रकल्प
- प्रोजेक्ट टायगर
- प्रोजेक्ट एलिफंट
- प्रोजेक्ट स्नो लेपर्ड
- प्रोजेक्ट डॉल्फिन इ.
दिवस १९:
शेती व पर्यावरण सेंद्रिय शेती
- जीएम पिके
- जैवखते
- हवामान-स्मार्ट शेती
दिवस २०:
आपत्ती
- चक्रीवादळे
- एल निनो व ला निना
- उष्णतेच्या लाटा
दिवस २१:
मागील ६ दिवसांत अभ्यासलेल्या घटकांचा अभ्यास
१०० प्रश्नांची मॉक टेस्ट
टप्पा चौथा – दिवस २२–३० : चालू घडामोडी व रिव्हीजन
दिवस २२–२४:
मागील २ वर्षातील पर्यावरणसंबंधित चालू घडामोडी
- हवामान परिषद
- नवीन प्रजाती शोध
- पर्यावरणीय अहवाल
- शासकीय योजना
दिवस २५:
शासकीय उपक्रम
- हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना
- प्रतिपूरक वनीकरण कोष व्यवस्थापन आणि योजना प्राधिकरण (कॅंपा)
- राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण
दिवस २६ :
१०० प्रश्नांची मॉक टेस्ट व तिचे विश्लेषण करा.
दिवस २७:
१०० प्रश्नांची मॉक टेस्ट व तिचे विश्लेषण करा.
दिवस २८:
जे प्रश्न चुकलेत वा सोडविता आले नाही त्या घटकांचे रिव्हीजन करा. संकल्पना समजून घ्या.
दिवस २९ – ३०:
वारंवार प्रश्न ज्या घटकांवर विचारले जातात त्या घटकांचे रिव्हीजन करा.
गेल्या १५ वर्षातील प्रश्न पुन्हा एकदा बघा.
पर्यावरणाचा अभ्यास करताना नकाशा सोबत असावा. संकल्पना व तथ्ये समजून घ्या. वरील नियोजन तुम्हाला विषयाचे सर्व घटक वेळेत अभ्यासण्यास मदत करेल तेव्हा या नियोजनानुसार अभ्यासाची आखणी करा.
sushilbari10@gmail.com

