या विषयाचा अभ्यास करताना अपेक्षित घटकांवर लक्ष्य केंद्रित करायला हवे. जसे की, मंदिर वास्तुकला, बौद्ध-जैन धर्म, शास्त्रीय नृत्ये, चित्रकला आणि युनेस्को स्थळे. तथ्ये महत्त्वाची आहेत परंतु त्याच बरोबर संकल्पना आणि वैशिष्ट्यांच्या माध्यमातून अभ्यास करायला हवा. प्रश्नांचे स्वरूप समजून घ्या. विशेषत: विधानांवर आधारित प्रश्न ओळखण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नांचा सराव करा. तुलना करण्यासाठी तक्त्यांसह संक्षिप्त नोट्स तयार करा. जीआय टॅग आणि नवीन वारसा स्थळांसारख्या चालू घडामोडींचा समावेश करा. लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी नकाशे, रेखाचित्रे आणि प्रतिमा यांसारख्या दृश्य साधनांचा वापर करून नियमित उजळणी करा. कठीण पर्यायांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी सराव दरम्यान ‘एलिमिनेशन तंत्राचा’ वापर करा.
२०१३ ते २०२५ मध्ये यूपीएससी पूर्वपरीक्षेत ‘कला व संस्कृती’ या विषयातील वारंवार विचारलेले घटक आपण जाणून घेणार आहोत. २०२६ च्या पूर्व परीक्षेसाठी आपण या घटकांचा कला व संस्कृतीतील सर्वाधिक अपेक्षित घटक म्हणून अभ्यास करणे अपेक्षित आहे. हे घटक खालीलप्रमाणे आहेत –

मंदिर वास्तुकला
– शैली : नागर, द्रविड
आणि वेसर शैली.
– वैशिष्ट्ये : शिखर, विमान, गोपुरम.
– उदाहरणे : खजुराहो, बृहदीश्वर, होयसाळ मंदिरे.
टीप : हा या विषयातील
सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा घटक आहे. यात आपण तुलनात्मक अभ्यास करणे अपेक्षित आहे. उदा. नागर, द्रविड आणि वेसर शैलीतील महत्त्वाचा फरक जाणून घेऊया.
बौद्ध आणि जैन वास्तुकला
– स्तूप भाग : वेदिका, तोरण, हर्मिका.
– चैत्य विरुद्ध विहार.
– लेणी : अजिंठा, वेरूळ, कार्ला (लेणी वास्तुकला).
शास्त्रीय नृत्य
– आठ शास्त्रीय नृत्ये आणि त्यांची राज्ये : भारतीय शास्त्रीय नृत्ये आणि त्यांच्या संबंधित राज्ये: भरतनाट्यम – तमिळनाडू, कथक – उत्तर प्रदेश, कथकली – केरळ, मोहिनीअट्टम – केरळ, कुचीपुडी – आंध्र प्रदेश, ओडिसी – ओडिशा, मणिपुरी -मणिपूर, सत्रिया-आसाम.
– शास्त्रीय नृत्यांची वैशिष्ट्ये, वेशभूषा आणि वाद्ये.
– नुकतेच मिळालेले जीआय टॅग / मान्यता.
संगीत (हिंदुस्तानी आणि कर्नाटक)
– हिंदुस्तानी विरुद्ध कर्नाटक
– संगीत शैलीतील फरक.
– वाद्ये: तबला, वीणा, मृदंगम
– राग आणि ताल यांमधील मूलभूत संकल्पना.
चित्रकला
– लोककला : मधुबनी, वारली, गोंड चित्रकला.
– लघुचित्रे : मुघल, राजपूत, पहाडी इ.
– चित्रकलेची वैशिष्ट्ये आणि प्रमुख विषय.
साहित्य आणि भाषा
– वेद, उपनिषदे.
– संगम साहित्य (दक्षिण भारत)
– कालिदासांच्या साहित्यकृती.
– भक्ती साहित्य.
धर्म आणि तत्त्वज्ञान
– बौद्ध आणि जैन धर्मातील मूलभूत तत्त्वे.
– तत्त्वज्ञानाच्या सहा शाखा.
– भक्ती आणि सुफी परंपरा.
जत्रा आणि उत्सव
– महत्त्वाचे उत्सव आणि संबंधित राज्ये.
– त्यांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व.
हस्तशिल्प आणि जीआय टॅग
– जीआय टॅग मिळालेली उत्पादने.
– प्रादेशिक हस्तकला.
यात प्रामुख्याने चालू घडामोडींशी संबंधित प्रश्न विचारले जातात.
युनेस्को वारसा स्थळे
– सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळे.
– नव्याने समाविष्ट केलेली स्थळे

या विषयाचा अभ्यास हा ‘व्हिज्युअल मेमरी’च्या आधारे करा. चित्रे आणि नकाशे यासाठी आपण वापरू शकतो. पाठांतरापेक्षा आपला सांस्कृतिक वारसा समजून घ्या. मागील वर्षांच्या प्रश्नांचा सखोल सराव करा.
यातून आपल्याला असे लक्षात येईल की, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत व संस्कृती यांचा एकत्रित अभ्यास केल्यास आपण अधिकाधिक प्रश्न अचूकपणे सोडवू शकतो. वर दिलेले अपेक्षित घटक समजून त्याचे नियमितपणे उजळणी करा.
sushilbari10@gmail.com
