नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेखात इतिहास या विषयाचे ३० दिवसांचे नियोजन बघणार आहोत. इतिहास या विषयाचा आवाका मोठा असून त्यात आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास यांचा अभ्यास करायचा आहे. प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासताना सोबत कला व संस्कृती या घटकाचा अभ्यास होत जातो.
—
सर्वप्रथम आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करताना आपली रणनीती समजून घेवूयात. यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास या घटकांचा विचार करताना सर्वाधिक भर आधुनिक भारतावर देणे अपेक्षित आहे. एनसीईआरटी पुस्तके नियमित वाचून त्यांचे रिव्हीजन करायला हवे. इतिहासासाठी प्रमाणित संदर्भग्रंथ वाचायला हवेत. टाईमलाईन, कायदे, गव्हर्नर जनरल, सुधारणा चळवळी आणि कला-संस्कृतीतील स्थापत्य व बौद्ध-जैन धर्म यावर विशेष लक्ष द्या. मागील १५ वर्षांचे प्रश्न अभ्यासून त्याचे विश्लेषण करून ट्रेंड ओळखा म्हणजे आपण त्यानुसार अभ्यासाची दिशा ठरवू शकतो. दररोज आपण अभ्यासलेल्या घटकांवर एमसीकयू सराव करणे अपेक्षित आहेत. त्यात होणाऱ्या चुकांचे विश्लेषण करून गरज असलेल्या घटकांचे रिव्हीजन करायला हवे. नकाशे, तक्ते आणि तुलना पद्धती वापरून संकल्पना समजून घ्या. चालू घडामोडींशी जोडून कला व संस्कृती या विषयाचा अभ्यास करा.
इतिहासाचे ३० दिवसीय नियोजन आपण ३ टप्प्यांमध्ये करणार आहोत –
टप्पा १ (दिवस १–१०): प्राचीन भारत कला व संस्कृती
दिवस १–२ :
प्रागैतिहासिक काळ व सिंधू संस्कृती प्राचीन इतिहासाचे स्रोत
पाषाणयुग: पुरापाषाण, मध्यपाषाण, नवपाषाण
सिंधू संस्कृती: नगररचना, शिक्के, धर्म, ऱ्हास
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास
दिवस ३–४:
वैदिक काळ, महाजनपदे प्रारंभिक व उत्तर वैदिक समाज
वर्णव्यवस्थेची उत्क्रांती
१६ महाजनपदे
धार्मिक चळवळी: जैन व बौद्ध धर्म
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास
दिवस ५–६:
मौर्य ते गुप्त कालखंड – चंद्रगुप्त मौर्य इ.
सम्राट अशोक व त्यांचा धम्म
उत्तर-मौर्य राज्ये
गुप्त प्रशासन व सांस्कृतिक वैशिष्ट्ये
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास
दिवस ७ :
संगम कालखंड व दक्षिण भारतीय राज्ये संगम साहित्य
चोल प्रशासन व मंदिर स्थापत्य
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास
दिवस ८–९ :
भारतीय कला व संस्कृती (स्थिर चालू घडामोडींशी संबंधित)
मंदिर स्थापत्य: नागर, द्रविड, वेसर शैली.
बौद्ध स्थापत्य: स्तूप, चैत्य, विहार.
शास्त्रीय नृत्यप्रकार.
युनेस्को जागतिक वारसा स्थळे.
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस १०:
रिव्हीजन १०० प्रश्नांची सराव टेस्ट.
टेस्ट मध्ये झालेल्या चुका व त्यांचे विश्लेषण करणे.
टप्पा २ (दिवस ११–१८): मध्ययुगीन भारत
दिवस ११–१२:
दिल्ली सल्तनत
गुलाम वंश ते लोदी वंश
प्रशासन व इक्तादारी पद्धती
स्थापत्य वैशिष्ट्ये
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस १३–१५: मुघल काळ
बाबर, अकबर, औरंगजेब
मनसबदारी, सुल्ह-ए-कुल अशा संकल्पना, प्रशासकीय धोरणे
मुघल कला व स्थापत्य
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस १६ :
भक्ती व सूफी चळवळी
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस १७ :
मराठा साम्राज्य
विजयनगर साम्राज्य, विजयनगरचा समाज व अर्थव्यवस्था
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस १८ :
रिव्हीजन १०० प्रश्नांची सराव टेस्ट.
टेस्ट मध्ये झालेल्या चुका व त्यांचे विश्लेषण करणे.
टप्पा ३ (दिवस १९–३०): आधुनिक भारत
दिवस १९-२०:
युरोपीयांचे भारतात आगमन
ईस्ट इंडिया कंपनी
कर्नाटक युद्धे
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस २१–२३:
प्लासी व बक्सरचे युद्ध
तैनाती फौजेचे धोरण
गव्हर्नर जनरल
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस २४–२५:
सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ
१८५७ चा उठाव
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस २६–२८:
राष्ट्रीय चळवळ
असहकार, सविनय कायदेभंग, भारत छोडो
क्रांतिकारी चळवळी
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस २९:
घटनात्मक विकास – रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३ इ.
कॅबिनेट मिशन योजना
महत्त्वाची व्यक्तीमत्त्वे
मागील १५ वर्षांच्या प्रश्नांचा विश्लेषणासह अभ्यास.
दिवस ३०:
रिव्हीजन १०० प्रश्नांची सराव टेस्ट.
टेस्ट मध्ये झालेल्या चुका व त्यांचे विश्लेषण करणे.
इतिहास या विषयाचा आवाका मोठा असून योग्य रणनीती वापरली तरच आपल्याला पूर्वपरीक्षेत चांगले गुण मिळू शकतात. तेव्हा योग्य नियोजनाच्या आधारे अभ्यास हवा.
sushilbari10@gmail.com