केंद्रीय लोकसेवा आयोगाने( युपीएससी) असिस्टंट इंजिनिअरसह इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवार युपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत वेबलाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात. ही मोहीम २० पदांच्या भरतीसाठी आयोजिक करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.
रिक्त जागा तपशील
- सायंटिस्ट बी(इलेक्ट्रिकल) : १ पदे
- असिस्टंट इंजिनिअर: ९ पदे
- स्पेशलिस्ट ग्रेड III: ६ पदे
- ज्युनिअर शीप सर्व्हे-कम असिस्टंट डायरेक्टर जनरल – १ पद
- ज्युनिअर रिसर्च ऑफिसर : ३ पदे
पात्रता निकष
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.|
अधिकृत अधिसूचना – https://www.upsc.gov.in/sites/default/files/Advt-No-10-2023-engl-260523.pdf
अर्ज शुल्क
उमेदवारांना २००/- रुपये शुल्क भरावे लागेल. एकतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोखीने पैसे पाठवून किंवा कोणताही व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड/यूपीआय वापरून पेमेंट किंवा कोणत्याही बँकेचे नेट बँकिंग वापरून अर्ज शुल्क भरू शकता. शुल्क भरण्यापासून अनुसूचित जाती/जमाती/महिला उमेदवारांना सुट देण्यात आली आहे.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.