UPSC Jobs 2024: तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) अधिसूचना जारी केली आहे आणि अनेक पदांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यानुसार UPSC अनेक पदांवर भरती करणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत साइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२४ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर रिक्त पदांपासून ते पगारापर्यंतची माहिती वाचू शकतात. अर्ज कसा भरवा याची माहिती देखील खाली दिली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या भरतीद्वारे एकूण ८३ पदे भरणार आहे. त्यात, टेस्ट इंजिनिअर, मार्केंटिंग ऑफिसर,असिस्टंट कमिश्नर, सायंटिफिक ऑफिसर, फॅक्टरी मॅनेजर, असिस्टंट मायनिंग इंजिनिअर, असिस्टंट रिसर्च ऑफिसर, ट्रेंनिंग ऑफिसर, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर या पदांचा समावेश आहे. अधिकृत सुचनेमध्ये पदानुसार पात्रता दिली आहे. अधिसुचना काळजीपूर्वक वाचा.

हेही वाचा – १२ वी पास उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि निकष

UPSC Jobs 2024 : भरती केली जाणारे पदे

 • १. असिस्टंट कमिश्नर – १ पद
 • २. टेस्ट इंजिनिअर – १ पद
 • ३. मार्केंटिंग ऑफिसर – ३ पदे
 • ४. सायंटिफिक ऑफिसर – १ पद
 • ५. फॅक्टरी मॅनेजर – १ पद
 • ६. असिस्टंट मायनिंग इंजिनिअर – ७
 • ७. असिस्टंट रिसर्च ऑफिसर -१५
 • ८. ट्रेंनिंग ऑफिसर (महिला प्रशिक्षण) – १
 • ९. आर्किटेक्चरल असिस्टंटशिप ( बांबूची वर्क, केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी, कॉस्मेटोलॉजी, ड्राफ्ट्समन सिव्हिल, फॅशन डिझाईन आणि तंत्रज्ञान, फळे आणि भाज्या प्रक्रिया, मीडिया रिसोर्स सेंटर, शिकवण्याची तत्त्वे, तांत्रिक अधिकारी) – १६
 • ८.प्रोफेसर (स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग – ३ पदे
 • ९.असिस्टं प्रोफेसर( स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
 • संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी) – ५ पदे

UPSC Jobs 2024 पगार किती असेल?

संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल१३ ए पे मॅट्रिक्स अंतर्गत ४४ हजार ९०० रुपये ते १ लाख ४२ हजार ४०० रुपयांपर्यंत पदानुसार पगार मिळू शकतो.

हेही वाचा – Central Bank of India: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु; ‘ही’ घ्या फॉर्म भरण्याची थेट लिंक, आजच करा अर्ज

UPSC Jobs 2024: कशी होईल निवड?

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मुलाखतीत, अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवाराला प्रश्न आणि उत्तरे विचारली जातील. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

अधिकृत अधिसुचना – https://upsconline.nic.in/ora/oraauth/candidate/download_ad.php?id=NDA4VX3P9XSKCAGDL2MAAI6Z7HUQDYICKAK5QCSAWLONFCXAC1NIIX
अधिकृत संकेतस्थळ – https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

UPSC Jobs 2024: असा करा अर्ज

 • सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जा
 • यानंतर उमेदवार मुख्यपृष्ठावरील विविध भरती पदांसाठी ऑनलाइन भरती अर्जावर जा.
 • नंतर उमेदवार या पदासाठी अर्ज करतात.
 • आता उमेदवार आवश्यक तपशील प्रविष्ट करतात.
 • त्यानंतर उमेदवार आवश्यक कागदपत्रे अपलोड करतात.
 • आता उमेदवार अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म जमा करा.
 • नंतर उमेदवाराने प्रिंट आउट घ्यावा.