नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) (भारत सरकारच्या पूर्णपणे मालकीची बँक) (Advt. No. ०१/ Grade A/२०२४-२५). NABARD च्या रूरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस ( RDBS) करिता ‘असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे - १०२. वेतन - दरमहा रु. १,००,०००/- अधिक इतर सुविधा. डिसिप्लिननुसार रिक्त पदांचा तपशील : ( I) असिस्टंट मॅनेजर ( RDBS) - १०० पदे (७ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव कॅटेगरी - व्हीआय - १, एचएच - २, एलडी - १, एमडी - ३). (१) जनरल - ५० पदे; पात्रता : (दि. १ जुलै २०२४ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी, एम्बीए / पीजीडीएम् किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना पदवी/ पदव्युत्तर पदवीमध्ये गुणांत ५ टक्केची सूट) (२) कॉम्प्युटर अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी - १६ पदे. (३) फिनान्स (बीबीए/बीएमएस) - ७ पदे. (४) चार्टर्ड अकाऊंटंट - ४ पदे; (५) सिव्हील इंजिनिअरींग - ३ पदे. (६) इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग - १ पद; (७) जीओ इन्फॉरमॅटिक्स - १ पद; (८) फॉरेस्ट्री - २ पदे; (९) फूड प्रोसेसिंग - १ पद; (१०) स्टॅटिस्टिक्स - २ पदे; (११) प्लँटेशन अँड हॉर्टिकल्चर - १ पद. (१२) अॅग्रिकल्चर - २ पदे; (१३) अॅनिमल हजबंडरी - २ पदे. (१४) फिशरीज - १ पद; (१५) डेव्हलपमेंट मॅनेजमेंट - ३ पदे (१६) एन्व्हिरॉन्मेंटल इंजिनिअरींग/ सायन्स - २ पदे. (१७) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट - २ पदे. पद क्र. २ ते १७ साठी पात्रता : संबंधित विषयातील पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. हेही वाचा >>> करिअर मंत्र (१८) असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) - २ पदे. पात्रता : हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातील पदवी किमान ६० टक्के गुण पदवीला किमान २ वर्षांकरिता हिंदी आणि इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत आणि किमान १ वर्ष कालावधीची ट्रान्सलेशन हिंदीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून हिंदीमधील पदव्युत्तर पदविका किंवा एम.ए. (हिंदी) ६० टक्के गुण, पदवीला किमान २ वर्षं इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा किंवा एम.ए. (इंग्लिश) ६० टक्के गुण पदवीला किमान २ वर्षं हिंदी विषय अभ्यासलेला असावा. CGPA/ OGPA/ CPI B. १० पॉईंट स्केलवर ६.७५, ६.२५, ५.७५ व ५.२५ साठी अनुक्रमे ६० टक्के गुण, ५५ टक्के गुण, ५० टक्के गुण व ४५ टक्के समजले जातील. वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२४ रोजी २१ ते ३० वर्षे. निवड पद्धती : निवडीचे ४ टप्पे. (अ) प्रीलिमिनरी एक्झामिनेशन - दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी घेतली जाईल. (सर्व पदांसाठी) परीक्षा केंद्र - औरंगाबाद, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, पणजी इ.; टेस्ट ऑफ रिझनिंग - २० प्रश्न, इंग्लिश लँग्वेज - ३० प्रश्न, कॉम्प्युटर नॉलेज - २० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड - २० प्रश्न, डिसिजन मेकींग - १० प्रश्न, जनरल अवेअरनेस - २० प्रश्न, इकॉनॉमिकल अँड सोशिऑलॉजीकल इश्युज ( ESI) (रूरल इंडिया संदर्भातील प्रश्नांवर जास्त भर असेल) - ४० प्रश्न, अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट ( ARD) (रूरल इंडिया संबंधित प्रश्नांवर जास्त भर असेल) - ४० प्रश्न, एकूण २०० प्रश्न, २०० गुण, वेळ १२० मिनिटे. जनरल अवेअरनेस, इको अँड सोशल इश्युज व अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट या तीन विषयांवरील (१०० गुण) गुणवत्तेनुसार उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील. (इतर विषय फक्त पात्रता स्वरूपाचे असतील.) हेही वाचा >>> नोकरीची संधी : एलआयसीमधील संधी (ब) पदनिहाय ऑनलाइन मुख्य परीक्षा पेपर-१ - जनरल इंग्लिश (वर्णनात्मक) - १०० गुण, (कॉम्प्युटर बेस्ड). पेपर-२ - ऑब्जेक्टिव्ह ५० गुण आणि डिस्क्रीप्टिव्ह - ५० गुण स्वरूपाची असेल. परीक्षा केंद्र - मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR आणि पुणे इ. पेपर-१ सर्व पदांसाठी अनिवार्य पेपर-२ (जर्नालिस्ट पदांसाठी) ESI & ARD विषयावरील प्रश्न विचारले जातील. (स्पेशालिस्ट पदांसाठी - संबंधित विद्याशाखांवर आधारित प्रश्न असतील.) (क) मुख्य परीक्षा झाल्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट घेतली जाईल. MCQ टाईप वेळ ९० मिनिटे. (ड) इंटरव्ह्यू - ५० गुणांसाठी (इंटरव्ह्यूसाठीचे केंद्र नंतर कळविण्यात येईल.) ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूमधील एकत्रित गुणवत्तेनुसार उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग - (PRT) अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांसाठी बँक विनामूल्य प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग ऑनलाइन मोडने आयोजित करणार आहे. त्याकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील संबंधित माहिती भरावयाची आहे. अॅप्लिकेशन फी - रु. ७००/- आणि इंटिमेशन चार्जेस रु. १५०/-, एकूण रु. ८५० (अजा/ अज/दिव्यांग उमेदवारांना अॅप्लिकेशन फी माफ आहे, त्यांना फक्त रु. १५०/- इंटिमेशन चार्जेस साठी भरावे लागतील.) उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतात. शंकासमाधानासाठी वर संपर्क साधा. (Candidates grievance lodging and Redressal Mechanism) ऑनलाइन अर्ज www.nabard.org या संकेतस्थळावर दि. १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत करावेत. ( Application Registration; Payment of Application Fees; Photograph & Signature, Hand Written declaration, left hand thumb impression Scan & Upload)