महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागांतील ‘अनुरेखक(गट-क)’ संवर्गातील रिक्त पदांची भरती. एकूण रिक्त पदे- १२६ (जाहिरात क्र. ३/२०२४) तसेच ‘कनिष्ठ आरेखक(गट-क)’ संवर्गातील रिक्त पदांची भरती. एकूण रिक्त पदे- २८ (जाहिरात क्र. ०२/२०२४). (१) जाहिरात क्र. ३/२०२४ –

पदाचे नाव : अनुरेखक (गट-क)’ एकूण रिक्त पदे – १२६ (वेतन स्तर – एस-७ (रु. २१,७०० ६९,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४२,०००/-).

(२) जाहिरात क्र. २/२०२४ –

पदाचे नाव – कनिष्ठ आरेखक (गट-क)’ – एकूण रिक्त पदे – २८ (अजा – ३, अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ५, शा व शैमाप्र – ३, आदुघ – ३, खुला – ७) (१ पद दिव्यांग (कॅटेगरी D/ HH) साठी राखीव) महिलांसाठी ८ पदे राखीव. (वेतन स्तर – एस-८ (रु. २५,५०० – ८१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४८,०००/-).

पात्रता : (दोन्ही पदांसाठी) १२ वी नंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षांचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र किंवा समतूल्य.

तांत्रिक अर्हता : ‘ AutoCAD’ किंवा ‘Geographical Information System in Spatical Planning’ प्रमाणपत्र.

हेही वाचा >>> शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी

अर्जाचे शुल्क : प्रत्येक पदासाठी रु. १,०००/- (अराखीव); रु. ९००/- (राखीव प्रवर्ग). माजी सैनिकांसाठी अर्जाचे शुल्क माफ आहे. (ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क दि. १८ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत भरता येईल.)

वयोमर्यादा : (दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी) १८ ते ३८ वर्षे. मागासवर्गीय/ खेळाडू/ आदुघ/ सा व शैमाप्र – १८ ते ४३ वर्षे; दिव्यांग/ भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त/ दिव्यांग – १८ ते ४५ वर्षे; पदवीधर अंशकालीन – १८ ते ५५ वर्षे; (सशस्त्र दलात झालेली सेवा ३ वर्षांपर्यंत माजी सैनिकांना कमाल वयोमर्यादेत सूट असेल.)

अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या इ. बाबतचा तपशील

www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.in व https://ese.mah.nic.in या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’मध्ये लिंक प्रसिद्ध करतेवेळी उपलब्ध करून देण्यात येतील.

निवड पद्धती : दोन्ही पदांसाठीची परीक्षा दोन स्तरांवर घेण्यात येणार असून बहुपर्यायी ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के ठगुण मिळालेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाईल. ऑनलाइन अर्ज www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर १७ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

Story img Loader