scorecardresearch

१० वी पास आहात? रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, परीक्षा नाही, अर्ज करताना या गोष्टींची काळजी घ्या

रेल्वेच्या या विभागात नोकरी करण्यासाठी तुम्हाला परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. अर्ज करताना या गोष्टींची काळजी घ्या.

Government Jobs Latest Update
रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी. (Image-Graphics Team)

Railway Recruitment: रेल्वेत अॅपरेंटिस पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. आरसीएफ, कपूरथला मध्ये वेगवेगळ्या ट्रेंड्समध्ये अॅपरेंटिस अधिनियम १९६१ नुसार ५५० अॅपरेंटिस पदांसाठी नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. योग्य उमेदवार ४ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टींबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज करताना पात्रता निकष, नियम व अटिंची पूर्तता होईल, हे निश्चित करणे महत्वाचे आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन्स पाहू शकता.

RCF Recruitment 2023 Apprentice: रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख इथे तपासू शकता आणि ऑनलाईन आरसीएफ अॅपरेंटिस २०२३ अॅप्लिकेशन फॉर्म लिंकचा वापर करून अॅपरेंटिस पदांसाठी अर्ज करु शकता. योग्य उमेदवार इथे दिलेल्या तारखेवर ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याचा अन्य कोणत्याही प्रकारची पद्धत ग्राह्य धरली जाणार नाही. उमेदवारांना पदांसाठी पात्र होण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत दिलेली वयाची अट पूर्ण करावी लागेल. उमेदवारांचे वय कमीत कमी १५ वर्ष आणि जास्तीत जास्त २४ वर्ष असले पाहिजे. सरकारी नियमांनुसार, रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

नक्की वाचा – केंद्र आणि राज्य सरकारच्या या विभागात बंपर भरती, रेल्वे मंत्रालयाने घेतला हा मोठा निर्णय

निवडप्रक्रियेसाठी या पदांची कोणतीही परीक्षा होणार नाही. यासाठी उमेदवारांच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट बनवली जाईल. नॅशनल काउंसिल फॉर वोकेशनल ट्रेनिंनच्या माध्यमातून तसेच प्रासंगिक ट्रेडमध्ये उमेदवारांनी १० वी किंवा समकक्षात (५०%) गुण आणि राष्ट्रीय प्रमाणपत्रानुसार उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा कराल?

अधिकृत आरसीएफ वेबसाइट http://www.rcf.indianrailways.gov.in वर क्लिक करा.
अर्ज फक्त ऑनलाई माध्यमातूनच स्विकारला जाईल.
होमपेजवर वर्ष २०२३-२४ साठी प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी अधिनियम अॅपरेंटिसचे ऑनलाईन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
उमेदवारांना एक व्हॅलिड ईमेल-आईडी आणि मोबाईल नंबरचा वापर करून रजिस्ट्रेशन करावं लागेल.
लॉग इन करा आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डचा वापर करून अर्ज करा.
उमेदवारांनी सर्व आवश्यक माहितीसह ऑनलाईन फॉर्म भरावा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज भरण्यासाठी लागणारे शुल्क भरा. अर्ज जमा करा आणि प्रिंट आऊट घ्या.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 14:51 IST
ताज्या बातम्या