देशांतर्गत सुमारे २०० संस्थांमध्ये व्यवस्थापनशास्त्र विषयातील विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे राष्ट्रीय स्तरावर मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट घेण्यात येते. मॅट डिसेंबर २०१७ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
  • निवड पद्धत – अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची लेखी निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १० डिसेंबर २०१७ रोजी, तर संगणकीय पद्धतीने निवड परीक्षा १६ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येईल. उमेदवार विद्यार्थ्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे संबंधित शैक्षणिक संस्था अथवा महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थानशास्त्र विषयातील एमबीए वा पदविका अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येतो.
  • अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जदारांनी अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून संगणकीय पद्धतीने १२७१ रु. व जीएसटी एवढी रक्कम भरणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – मॅट डिसेंबर २०१७ ही प्रवेश पात्रता परीक्षा व अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या http://www.aima.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१७.