16 January 2021

News Flash

यशाचे प्रवेशद्वार ; क्रीडा क्षेत्रातील ज्ञानार्जन

क्रीडाक्षेत्राची भरभराट ही या क्षेत्रातील शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन या त्रिसूत्रीवर आधारित असते.

प्रतिनिधिक छायाचित्र

क्रीडाक्षेत्राची भरभराट ही या क्षेत्रातील शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन या त्रिसूत्रीवर आधारित असते. त्यामुळे ग्वाल्हेर स्थित लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांची संरचना ही व्यापक अशी असून उत्तम दर्जाचे प्रशिक्षक-अध्यापक आणि संशोधक तयार होण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. मागील लेखात काही अभ्यासक्रमांचा मागोवा घेण्यात आला होता. असेच काही अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग-

कालावधी एक वर्ष. याअंतर्गत अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, टेनिस आणि व्हॉलिबॉल या खेळांच्या प्रशिक्षकासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाते. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०१८ आहे. ग्वाल्हेर येथे ४ आणि ५ जुलै २०१८ रोजी प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाईल.

अर्हता- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील ४५ टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४० टक्के गुण.

चाळणी परीक्षा- एकूण गुण २००. किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक. १) लेखी परीक्षेसाठी ५० गुण.( यामध्ये कार्यकारणभाव – रिझनिंग-१० गुण, क्रीडाक्षेत्राचे सामान्यज्ञान – १० गुण, संबंधित क्रीडा प्रकारातील व्यावसायिक ज्ञान – ३० गुण. कालावधी ९० मिनिटे.) २) शारीरिक क्षमता चाचणी – ५० गुण. (यामध्ये ५० मीटर दौड, उंच उडी, गोळाफेक, १००० मीटर धावणे/चालणे, अशासारख्या बाबींचा समावेश.)  ३) संबंधित क्रीडा प्रकारातील कौशल्य – १०० गुण.

काय शिकाल?

क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा औषधे, मुख्य क्रीडाप्रकारांचा अभ्यासक्रम, स्पोर्ट्स थ्रोपोमेट्री (खेळाडू शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहण्यासाठी त्याच्या उंची व वजनाच्या सुयोग्य प्रमाणाकडे लक्ष ठेवणे.),व्यायामाचे शरीरविज्ञानशास्त्र स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स (भौतिकशास्त्रातील वेग आणि कृती सिद्धांतांचा वापर करून खेळाडूच्या जैविक प्रणालीची रचना आाणि कार्ये समजून घेणे). प्रात्यक्षिके – खेळण्याचे कौशल्य आणि क्षमता, शिकवण्याची क्षमता, प्रशिक्षणाचे कौशल्य.

मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एम.पी. एड्.) –

कालावधी – दोन वर्षे. हा अभ्यासक्रम पुढील सहा विषयांमध्ये स्पेशलायझेशन करण्याची संधी उपलब्ध करून देतो. –

१) स्पोर्ट्स सॉयकॉलॉजी, २) एक्झरसाइज फिजिऑलॉजी, ३) हेल्थ एज्युकेशन,

४) स्पोर्ट्स मॅनेजमेंट, ५) स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स, ६) फिजिकल एज्युकेशन पेडॅगॉगी

अर्हता – ५० टक्के गुणांसह बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बी.पी.एड्.) किंवा ५० टक्के गुणांसह बी.एस्सी. इन फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड हेल्थ.

परीक्षा अशी असते –

चाळणी परीक्षेत पुढील बाबींचा समावेश असतो. १) लेखी परीक्षा – १०० गुण. प्रश्न बी.पी. एड्. अभ्यासक्रमावर आधारित असतात. कालावधी दोन तास. २) क्रीडा कौशल्य आणि नैपुण्य आणि कामगिरी चाळणी. गुण १००. खेळातले तांत्रिक कौशल्य, प्रत्यक्ष कामगिरी आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिवहर्सिटीजने मान्यता प्रदान केलेल्या एखाद्या क्रीडा पक्रारातील सर्वागीण खेळण्याची क्षमता लक्षात घेऊन तज्ज्ञ समिती गुण प्रदान करते.

विशेषीकरण (स्पेशलायझेशन) –

बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, जिमनॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, स्विमिंग, टेनिस, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड आणि हँडबॉल या क्रीडा प्रकारांमधीलच विशेषीकरणाची सुविधा पुरवण्यात येते. यामध्ये सैद्धांतिक अभ्यास, कौशल्य आणि प्रशिक्षणाचे धडे या तीन घटकांचा समावेश आहे.

थेट प्रवेश –

पुढील अर्हताप्राप्त व्यक्तींना थेट प्रवेश दिला जातो. त्यांना अर्ज ऑनलाइन सादर करावा लागतो. कनिष्ठ आणि वरिष्ठ जागतिक क्रीडा स्पर्धा, कनिष्ठ आणि वरिष्ठ आशियाई क्रीडा स्पर्धा, आफ्रो – एशियन क्रीडा स्पर्धा, दक्षिण आशिया महासंघ क्रीडा स्पर्धा, जागतिक शालेय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले उमेदवार थेट प्रवेशासाठी पात्र ठरतात.

या स्पर्धामधील क्रीडा प्रकारांना ऑल इंडिया युनिव्हर्सिटीज असोसिएशन, इंटरनॅशनल ऑलम्पिक असोसिएशन आणि युवक व क्रीडा मंत्रालयाने मान्यता प्रदान केलेली असावी. उमेदवाराचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

१ जुलै रोजी हे वय ग्राह्य धरले जाते.

काय शिकाल?

१) संशोधन कार्यप्रणाली, २) उपयोजित सांख्यिकी, ३) क्रीडा प्रशिक्षणाचे शास्त्र,

४) योगविज्ञान, ५) शारीरिक शिक्षण, ६) शारीरिक शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, ७) क्रीडा औषधोपचार, खेळाडूंची काळजी आणि पुनर्वसन, ८) शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्य, ९)व्यायामाचे शरीरविज्ञानशास्त्र,

१०) आरोग्य शिक्षण, ११) स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स –  क्रीडापटूंच्या शारीरिक हालचाली आणि वेगाचा शास्त्रीय अभ्यास, १२) क्रीडा व्यवस्थापन, १३) क्रीडा पत्रकारिता, (१४) क्रीडा शरीरविज्ञानशास्त्र, १५) महिला आणि पुरुष क्रीडापटू व सर्वसमावेश शिक्षण, १६) क्रीडा पोषणआहार

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट –

कालावधी एक वर्ष. अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जून २०१८. प्रवेश परीक्षा ६ आणि ७ जुलै रोजी. अर्हता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील ४५ टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४० टक्के गुण.

चाळणी परीक्षा – एकूण गुण – १००. १) ४० गुणांची शारीरिक क्षमता चाळणी. यात ५० मीटर दौड, उंच उडी, गोळाफेक, १००० मीटर धावणे/चालणे, अशा बाबींचा समावेश.

२) लेखी परीक्षा – ६० गुण. यामध्ये सामान्य जागरूकता, क्रीडा जगताविषयी जाणीवजागृती, क्रीडाक्षेत्राचे सामान्य ज्ञान यावरील प्रश्न विचारले जातात. कालावधी ९० मिनिटे.

काय शिकाल?

व्यवस्थापन आणि संस्थात्मक वर्तणूक तत्त्वे, वित्तीय व्यवस्थापन, क्रीडा व्यवस्थापनाची पायाभूत तत्त्वे, विपणन व्यवस्थापन, व्यवसाय संवादकौशल्य, कार्यान्वयन व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता आणि समकालीन समस्या – क्रीडा संस्थाचे पूनर्रचना, जनसंपर्क आणि माध्यमे व्यवस्थापन, क्रीडा सुविधा आणि घटना/कार्यक्रम यांचे संनियत्रंण, आरोग्य व्यवस्थापन यांचा समावेश. प्रात्यक्षिक – एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन. यामध्ये एरोबिक्स/स्विमिंग फिटनेस क्लब मॅनेजमेंट, योग आदी घटकांचा समावेश.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स जर्नालिझम

कालावधी एक वर्ष. अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जून २०१८. प्रवेश परीक्षा ६ आणि ७ जुलै. अर्हता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील ४५ टक्के गुणांसह पदवी.अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४० टक्के गुण.

चाळणी परीक्षा – गुण – १०० गुण. १) ३० गुणांची शारीरिक क्षमता चाळणी. या चाळणीमध्ये ५० मीटर दौड, उंच उडी, गोळाफेक, १००० मीटर धावणे/चालणे, अशा बाबींचा समावेश. २) लेखी परीक्षेसाठी ७० गुण. यामध्ये सामान्य जागरूकता, क्रीडा जगताविषयी जाणीवजागृती, क्रीडाक्षेत्राचे सामान्य ज्ञान या घटकांवरील प्रश्न विचारले जातात. कालावधी ९० मिनिटे.

काय शिकाल?

संवादसंप्रेषणाचे (कम्युनिकेशन) विविध सिद्धांत आणि वृत्तपत्रीय कायदे, वार्ताकन, लेखन आणि संपादन, क्रीडाशास्त्रची पायाभूत तत्त्वे, क्रीडाक्षेत्राचा इतिहास आणि उत्क्रांती, क्रीडा विषयावर नियतकालिकांमध्ये लिखाण, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्राची मूलभूत तत्त्वे,

प्रात्यक्षिके – स्विमिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, अ‍ॅथेलिटिक्स, व्हॉलिबॉल.

पीएच.डी.

क्रीडा व्यवस्थापन, योग, क्रीडा मानसशास्त्र, आरोग्य शिक्षण, व्यायाम, शरीरविज्ञानशास्त्र, शारीरिक शिक्षण अध्यापनशास्त्र या विषयांमध्ये पीएच.डी. करता येते. कालावधी किमान ३ वर्षे आणि कमाल ५ वर्षे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०१८. रिसर्च इलिजिबिलिटी टेस्ट – १८ जुलै. मुलाखती आणि सादरीकरण- २५ जुलै २०१८. अर्हता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील ५५ टक्के गुणांसह एम.पीएड्. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ५० टक्के गुण.

इतर अभ्यासक्रम –

१) एम.ए.इन स्पोर्ट्स फिजिऑलॉजी,

२) एम.एस्सी. इन एक्झरसाईज फिजिऑलॉजी, ३) एम.एस्सी. इन स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स

महत्त्वाचे –

१) या सर्व अभ्यासक्रमांना काही अटींसह महिलांना प्रवेश दिला जातो. २) अभ्यासक्रमांना निवड होण्यासाठी लेखी आणि शारीरिक क्षमता चाचणी देणे अत्यावश्यक आहे. (३) सर्व चाळणी परीक्षा ग्वाल्हेर येथे संस्थेच्या कॅम्पसमध्ये घेतल्या जातात. ४) शुल्क – अ) एम.ए. आणि एम.एस्सी. – पहिले वर्ष – ६८ हजार ८०० रुपये, दुसरे वर्ष – ९६ हजार रुपये, ब) पीएच.डी. – पहिले वर्ष  – ७१ हजार ८०० रुपये,

क) एम.पी.एड्., पोस्ट ग्रज्युएशन डिप्लोमा –  पहिले वर्ष – ७१ हजार ८०० रुपये, दुसरे वर्ष –  ९९ हजार रुपये ५) संपर्क – शक्तीनगरी, रेसकोर्स रोड, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश – ४७४००२, दूरध्वनी – ०७५१ – ४०००९००, फॅक्स – ४०००९९०, संकेतस्थळ  –   http://www.lnipe.edu.in

ईमेल – registrar@lnipe.edu.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 4:29 am

Web Title: article on career in sports sector
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : कृषी घटक आर्थिक व विश्लेषणात्मक अभ्यास
2 करिअर कथा : नृत्यबिजली
3 यूपीएससीची तयारी : नियोजनाचे महत्त्व
Just Now!
X