भारतामध्ये लघु व मध्यम स्वरूपाचे साधारणत: २ लाख ५० हजार प्रिंटिंग व पॅकेजिंग व्यवसाय असून, दरवर्षी फक्त १५०० ते २००० विद्यार्थी प्रिंटिंग व पॅकेजिंगचे प्रशिक्षित होत आहेत. म्हणूनच टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनने प्रिंटिंग व पॅकेजिंग क्षेत्रात विविध कोर्स सुरू केले आहेत.
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेट या संस्थेमार्फत अंधेरी येथे विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रातील विविध कोर्स सुरू करण्यात आले आहेत. यूजीसी व एआयसीटीईमार्फत मान्यताप्राप्त टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनद्वारे या कोर्ससाठी कौशल्य विकासावर भर देण्याकरिता वर्क इंटीग्रेटेड व्होकेशनल एज्युकेशन पद्धती अवलंबण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यार्थी आठवडय़ातील ५ दिवस त्याला ठरवून दिलेल्या मुद्रकाकडे प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण घेईल व आठवडय़ातून एक दिवस थिअरी प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळू शकतो. तीन वर्षे मुदतीच्या या कोर्स पूर्ततेनंतर विद्यार्थ्यांला B.VOC. ही पदवी देण्यात येईल. प्रिंटिंग व पॅकेजिंग क्षेत्रातील विविध कोर्ससंबंधी माहिती घेण्यासाठी संपर्क साधा.
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेन्ट, स्थानिक राजभवन, सी.डी. बर्फीवाला मार्ग, अंधेरी (प.),
फोन नं. ०२२-२६२०६७१६
ई-मेल- exam@aiilsg.org