16 December 2017

News Flash

बायोइन्फरमॅटिक्स इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्रॅम २०१७-१८

अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखती १ ते १५ नोव्हेंबर २०१७ च्या दरम्यान घेण्यात येतील

लोकसत्ता टीम | Updated: September 29, 2017 1:05 AM

केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे शैक्षणिक संस्था व उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने बायोइन्फरमॅटिक्स इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्रॅम (बीआयआयटीपी)घेण्यात येतो. बायोटेक्नॉलॉजी विषयातील हुशार विद्यार्थ्यांना सराव प्रशिक्षणासह विशेष शिक्षण संधी उपलब्ध करून देणे हे या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे उद्दिष्टय़ असते. बीआयआयटीपी २०१७-१८ साठी  पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. –

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी बायोइन्फरमॅटिक्स विषयातील बीई, बीटेक, एमएससी, एमटेक वा याच विषयातील विशेष पदविका पात्रता कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखती १ ते १५ नोव्हेंबर २०१७ च्या दरम्यान घेण्यात येतील व त्याआधारे त्यांची विशेष प्रशिक्षण सत्रासाठी निवड करण्यात येईल.

प्रशिक्षणाचे स्वरूप, कालावधी व पाठय़वेतन- योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना बायोइन्फरमॅटिक्स क्षेत्रातील उद्योगांमध्ये विशेष सरावासह प्रशिक्षण देण्यात येईल.

या विशेष प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल व त्यादरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १० हजार रु. पाठय़वेतन स्वरूपात देण्यात येतील.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची बीआयआयटीपी- २०१७-१८ ची जाहिरात पाहावी. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी http://bcil.nic.in/biitp2017-18/index.asp या संकेतस्थळावर तर नोंदणीसाठी http://bcil.nic.in/biitp2017-18/registration1.asp या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज मॅनेजर, बायोटेक, कन्सोर्टियम इंडिया लिमिटेड, ५ वा मजला, अनुव्रत भवन, २१०, पं. दीनदयाळ उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- ११०००२ या पत्त्यावर ५ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

First Published on September 29, 2017 1:05 am

Web Title: bioinformatics industrial training program 2017 18