प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जन्म प्रमाणपत्र हे जन्म दिनांक व ठिकाण दाखविणारे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. शासकीय विविध योजनांचा, सेवासवलतीचा फायदा घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरते. मतदान अधिकारप्राप्ती, शाळेत प्रथम प्रवेश, कायदेशीर विवाह वय प्रमाणित करण्यासाठी, वंशगत संपत्ती अधिकारप्राप्ती, पासपोर्ट इ.कारणांसाठी जन्म प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा आहे.

  • जन्म दाखला प्राप्तीच्या दृष्टीने ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांच्यातर्फे स्वतंत्र नोंदणी कक्ष स्थापन केलेला असतो.
  • जन्म प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रथम ज्या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले आहे तेथे जन्म नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणित जन्म दाखला मिळविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून २१ दिवसाच्या आत स्थानिक जन्म नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावा
  • संबंधित अधिकार ज्या रुग्णालयातील रेकॉर्डची सत्यता पडताळणी करून जन्म प्रमाणपत्र देईल.
  • जर निर्धारित मुदतीच्या आत नोंदणी झालेली नसेल तर राजस्व अधिकाऱ्याच्या आदेशाने पोलिसांद्वारे प्रमाणित प्रतिज्ञापत्र केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र काढता येते.
  • ६ वर्षे पूर्ण असूनही जन्म दाखला नसेल तर पुढील कागदपत्र जमवावे लागतात आणि दाखला काढता येतो.

१.    विहित नमुन्यातील अर्ज, कोर्ट फी स्टँम्पसह रु.१०० च्या बॉँड पेपरवर शपथपत्र

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

२.    ग्रामसेवकाचा दाखला

३.    गावाचे सरपंच किंवा वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र