News Flash

का? कुठे? कसे? : बोन्सायची निर्मिती

बोन्साय, ज्याला मराठीत वामनवृक्षही म्हटले जाते असे खुंटलेले झाड घरात सजावटीसाठी वापरले जाते.

बोन्साय, ज्याला मराठीत वामनवृक्षही म्हटले जाते असे खुंटलेले झाड घरात सजावटीसाठी वापरले जाते. घरातील टेबलावर अथवा खिडकीवर हे छोटेसे वृक्ष तुमच्या घराची शोभा वाढवते. फेंगशुई व वास्तुशास्त्रामध्येही बोन्सायचे महत्त्व आहे. तुम्ही बोन्सायनिर्मितीचा व्यवसायही करू शकता. यासाठी तुम्हाला बोन्साय म्हणजे काय हे जाणून घ्यावे लागेल.

बोन्साय कसे बनते

निसर्गामध्ये पाण्याचा अभाव, अन्नद्रव्यांची कमतरता यासारख्या स्थितीमध्ये वाढणाऱ्या झाडांची वाढ खुंटते. सुरवातीच्या काही वर्षांमध्ये झाडांची खुंटलेली वाढ अनेक वर्षांनंतरही खुंटलेलीच राहते. अशा प्रकारे बोन्सायची निर्मिती होते.

बोन्साय हा जपानी शब्द असून, मराठीमध्ये त्याला वामनवृक्ष असे म्हणतात

या तंत्राची सुरुवात बाराव्या शतकात झाल्याचे मानले जाते. प्रत्येक वस्तूस लहान रूप देण्याच्या स्वाभाविक जपानी प्रवृत्तीतून विकसित झाले असावे.

या तंत्राचा प्रसार जगभरामध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धानंतरच झाला. अमेरिकेपाठोपाठ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत व अन्य देशांत ही वामनवृक्ष कला विकसित होत गेली.

बोन्सायची लागवड

बोन्सायनिर्मितीसाठी निसर्गातून गोळा केलेली, रोपवाटिकांतून मिळवलेली, बियांपासून तयार केलेली, कलमापासून तयार केलेली रोपे वापरता येतात.

साध्या कुंडीतील साधारणत: एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे रोप निवडावे.

या कुंडीत तळाशी जाड माती व विटांचे बारीक तुकडे, मध्यम भागात खतमिश्रित मध्यम माती, वरील भागात खतमिश्रित बारीक माती टाकावी

कुंडीच्या तळभागात पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रे पाडावे.

छिद्रामधून माती व मुळे बाहेर पडू नयेत, यासाठी जाळी लावून घ्यावी

रोप हलू नये व रोपास आकार देण्यासाठी तारेचा वापर करावा.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या अशोक, आपटा, उंबर, अंजीर, वड, पिंपळ, आपटा, पिंपरी, शेवगा या झाडांचे बोन्साय तयार होतात.

टीप- केवळ वर्षांनुवर्षे झाडे कुंडय़ांमध्ये वाढवणे व त्यांची वाढ खुंटविणे याला बोन्साय म्हणता येत नाही. निसर्गाचा समतोल साधत पूर्ण वाढलेल्या वृक्षाची हुबेहूब लघू स्वरूपातील एक प्रतिकृती तयार करण्याच्या प्रक्रियेला बोन्साय म्हणता येते. त्यामध्ये झाडाचे खोड, फांद्या उपफांद्या व पाने, फुले, फळे हे एकमेकांसोबत प्रमाणबद्ध अवस्थेत असणे आवश्यक असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:24 am

Web Title: bonsai produce
Next Stories
1 वेगळय़ा वाटा : पेहराव खुलवण्याचे शास्त्र
2 एमपीएससी मंत्र : मुलाखतीचा अनुभव
3 ई बँकिंगद्वारे करप्रणाली
Just Now!
X