मी मराठी विषयात बी.ए. केले आहे. आता मला यशवंतराव मुक्त विद्यापीठातून एमबीए करायचे आहे. प्रवेशासाठी काय करावे? फी किती लागेल?

मनोज शेवते

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझे पदवीपर्यंतचे सर्व शिक्षण मराठीशी संबंधित व मराठीतून झाले आहे. एमबीए पूर्णत: इंग्रजीतून असणार आहे. त्याची तुझी तयारी आहे काय? तीच नसेल तर काय करायचे? किंवा दहा ते बारा मिनिटात इंग्रजी पुस्तकाचे एक पान वाचून, समजून घेऊन, त्याच्या नोटस् काढणे हा प्रकार जमत असल्यासच या रस्त्याचा विचार करावास. अन्यथा एमबीएचा तुझ्यासाठी उपयोग नाही.

( विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नवीन वर्षांच्या खूप शुभेच्छा. यंदाही करिअरमंत्र हे सदर आपल्यासोबत असणार आहेच. पण  यापुढे करिअर कौन्सेलर डॉ. श्रीराम गीत हे आपल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. आपले प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com या पत्यावर पाठवा)