मी सध्या बीएच्या पहिल्या वर्षांला शिकत आहे. पण मला नौदलामध्ये नोकरी करायची इच्छा आहे. मला त्यासाठी काय करावे लागेल?

संदीप पवार

संदीप, तू भारतीय नौदलाच्या अध्यापन विभागात अधिकारी म्हणून करिअर करू शकतोस. मात्र तुला त्यासाठी आधी एमए पदवी घ्यावी लागेल. एमएमध्ये तुला इंग्रजी/इतिहास या विषयांमध्ये किमान ५०% गुण मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तू शारीरिक आणि मानसिकरीत्या सक्षम असणे गरजेचे आहे. शारीरिक आणि वैद्यकीय सक्षमतेची काही मानके नौदलाने निर्धारित केली आहेत. त्यामध्ये तू बसतोस की नाही याची खात्री करूनच अर्ज करणे उचित ठरेल.

संपर्क   http://nausena-bharti.nic.in/eligible.php

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिीने एमबीए इन पोर्ट अँड शिपिंग मॅनेजमेंट आणि एमबीए इन इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते केल्यावर र्मचट नेव्हीमध्ये वा शििपग कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. संपर्क- http://www.imu.edu.in

मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग करत आहे. मला पाचव्या सत्रात ८८.२०टक्के मिळाले आहेत. मला अभियांत्रिकी पदवी तर घ्यायची आहेच, पण मला संशोधनातही रस आहे. त्याकडे माझा जास्त कल आहे. मी कशा प्रकारे माझे करिअर आखू?

हर्षरत्न सावंत

हर्षरत्न, तू दिलेल्या माहितीवरून असे दिसते की तुला डिप्लोमा अभ्यासक्रमात चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे तुला पदवीसाठी सहज प्रवेश मिळू शकेल. तुझी कामगिरी अशाच प्रकारे उत्तम राहिली तर पदवीनंतर लगेचच चांगली नोकरीही मिळेल.  मेकॅनिकलमधल्या गुणवंत विद्यार्थ्यांना तशी नोकरीसाठी अडचण येत नाही. पदवीनंतर तू गेट (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स- ॠं३ी) ही परीक्षा देऊन  इंटिग्रेटेड एमटेक- पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेश मिळवू शकतोस, ज्यामुळे तुझे  संशोधनाचे स्वप्न साकार होईल.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवरचा अभ्यासक्रम

सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवरतर्फे ऊर्जा क्षेत्रातील ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशनविषयक विशेष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांनी याठिकाणी अर्ज भरावेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :-  अर्जदार उमेदवारांनी इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग यासारख्या विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय अर्जदारांनी ‘जीएटीई’ प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

निवड पद्धती :- अर्जदार विद्यार्थ्यांची १० वी, १२ वी व इंजिनीअरिंग पदवी परीक्षेतील  गुणांची टक्केवारी  व ‘गेट’ प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क :- अर्जदारांनी प्रवेश अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ४०० रु.चा ‘सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर – नवी दिल्ली’ यांच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क :-  अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात  प्रकाशित झालेली सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवरची जाहिरात पाहावी अथवा बोर्डाच्या ०९८१८७३७४८० अथवा ०९८७१७१८२१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :-  विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर, सीबीआयपी सेंटर ऑफ एक्सलन्स, प्लॉट नं. २१, सेक्टर -३२, गुडगाव १२२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ मे २०१७.

दत्तात्रय आंबुलकर