आजच्या काळात इंजिनीअिरगच्या क्षेत्रातली आणखी एक नावाजलेली शाखा म्हणजे केमिकल इंजिनीअिरग. साबणापासून ते रंगउद्योगांपर्यंत आणि सौंदर्य प्रसाधनांपासून ते खाद्यपदार्थापर्यंत अनेक उद्योगांमध्ये केमिकल इंजिनीअिरग आणि इंजिनीअर्सना मागणी आहे. इंजिनीअिरगच्या इतर शाखांमध्ये जशा काही संबंधित शाखा उदयाला आल्यात, तशा केमिकल इंजिनीअिरगच्या कुटुंबात त्याच्याशी संबंधित काही विशिष्ट विषयांवर आधारित अशा पेट्रोकेमिकल इंजिनीअिरग आणि पॉलिमर इंजिनीअिरग या विशेष शाखा अस्तित्वात आल्या.

केमिकल इंजिनीअिरग

इंजिनीअिरगच्या या शाखेत, जर पदव्युत्तर पदवी म्हणजे एम. ई, एम. टेक्. किंवा पीएच.डी. करायचे असेल, तर प्रोसेस कंट्रोल, कॉम्प्युटर एडेड प्रोसेस प्लॅन्ट डिझाइन, इंडस्ट्रियल पोल्युशन अ‍ॅबेटमेंट, ट्रान्सफर ऑपरेशन्स, सेपरेशन प्रोसेसेस, बायो अ‍ॅण्ड फूड प्रोसेसेस अशा अनेक विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता येते. विविध उत्पादन तयार करीत असताना त्यावर नियंत्रण ठेवायचे काम केमिकल इंजिनीअर्सना करावे लागते. त्याला प्रोसेस कंट्रोल म्हणतात. हे नियंत्रण जर कॉम्प्युटरच्या साहाय्याने ठेवले जात असेल, तर असा प्लॅन्ट डिझाइन करायचं काम केमिकल इंजिनीअर करतो, तेव्हा त्याला कॉम्प्युटर एडेड प्रोसेस प्लॅन्ट डिझाइन असे म्हणतात. काही उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेत फार मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असते. तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवायचे काम केमिकल इंजिनीअर्सना ज्या शाखेत करावे लागते, त्याला इंडस्ट्रियल पोल्युशन अ‍ॅबेटमेंट असे म्हणतात. एखादा पदार्थ त्याच्या सद्य:स्थितीतून वेगळ्या स्थितीत परिवर्तित करणे म्हणजे ट्रान्सफर ऑपरेशन होय. एखाद्या पदार्थापासून त्याचे काही घटक वेगळे करून दुसऱ्या प्रकारचा वेगळे गुणधर्म असलेला पदार्थ तयार करायच्या प्रक्रियेला सेपरेशन प्रोसेस असं म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कच्च्या तेलापासून केली जाणारी विविध पेट्रोलियम पदार्थाची निर्मिती होय. जैव-रासायनिक प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया अनेक पदार्थाच्या बाबतीत पार पाडाव्या लागतात ते क्षेत्र, बायो अ‍ॅण्ड फूड प्रोसेसचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. केमिकल इंजिनीअर्सना या सर्व क्षेत्रांमध्ये बऱ्याच संधी उपलब्ध असतात.

या क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध आहेत. विशेषत: कन्सल्टन्सी म्हणजे सल्लागारीच्या संधी या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि तुमच्या गाठीशी या क्षेत्रातला अनुभव जर असेल, तर रासायनिक कारखान्यांना त्याचे ले-आऊट तयार करायला मदत करणे, औद्योगिक सुरक्षेबाबतच्या उपायांचे नियोजन करून देणे, एखाद्या रासायनिक प्रयोगशाळांमध्ये संशोधनाकरिता मार्गदर्शन करणे अशा अनेक प्रकारे कन्सल्टन्सी करता येऊ शकते. पण अर्थातच हे सगळे करण्याकरता गाठीशी अनुभव असण्याची गरज आहे. त्याकरिता ज्युनिअर इंजिनीअर किंवा ज्युनिअर असिस्टंट इंजिनीअर म्हणूनही नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या केमिकल इंजिनीअर्सना नोकऱ्या मिळू शकतात.

पेट्रोकेमिकल इंजिनीअिरग

ही केमिकल इंजिनीअिरगची विशेष शाखा असून अर्थातच नावाप्रमाणे पेट्रोलियम पदार्थाशी निगडित कंपन्यामध्ये म्हणजे एक तर मुंबई-हायसारख्या तेलविहिरींवर किंवा मग इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, िहदुस्तान पेट्रोलियम अशा पेट्रोलियम पदार्थाशी निगडित कंपन्यामध्ये या पदार्थाची निर्मिती किंवा प्रक्रियांशी संबंधित अशा कामांमध्ये ज्युनिअर असिस्टंट इंजिनीअर या पदापासून नोकऱ्या मिळू शकतात.

पॉलिमर इंजिनीअिरग

ही आणखी एक केमिकल इंजिनीअिरगच्या जवळ जाणारी पण पॉलिमर, प्लास्टिक, रबर यांच्याशी निगडित अशी शाखा आहे. मच्छीमारांसाठी जाळी, किंवा टेनिसची जाळी, सीमा भागात तात्पुरते पूल तयार करताना लष्कर वापरत असलेले पॉलिमरचे दोरखंड अशा गोष्टी तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये, तसेच मोटारींचे टायर्स तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये या शाखेत इंजिनीअिरग पूर्ण केल्यानंतर नोकऱ्या उपलब्ध होतात. यातही गाठीशी दांडगा अनुभव जमवलेला असेल, तर कन्सल्टन्सी करता येऊ शकते.

इंजिनीअिरगच्या या तिन्ही शाखांपकी अर्थातच पेट्रोकेमिकल आणि पॉलिमर या दोन शाखा पेट्रोलियम पदार्थ आणि पॉलिमर या विषयांशी निगडित असल्यामुळे यामधला स्कोप अर्थातच केमिकल इंजिनीअिरगच्या तुलनेत मर्यादित असतो. केमिकल इंजिनीअरला ज्याप्रमाणे अन्नप्रक्रिया, साबण, रंगउद्योग अशा शाखांमध्ये जसा वाव आहे, तसा इतर दोन शाखांमध्ये पदवी घेतलेल्यांना या इतर क्षेत्रांमध्ये वाव नाही.

एकूणच या तिन्हीपकी कोणत्याही शाखेतून बाहेर पडणाऱ्या फ्रेशर्सना पगाराची वार्षकि दोन ते तीन लाखांपासूनची पॅकेजेस मिळतात. पण तुमच्या गाठीशी जर या क्षेत्रातला अनुभव असेल, तर मात्र, या क्षेत्रातल्या नोकऱ्यांमधूनच नाही, तर कन्सल्टन्सीच्या माध्यमातूनही देशात आणि विशेषत: परदेशात काम करताना वार्षकि २० ते २५ लाखांपर्यंतही पॅकेजेस मिळू शकतात. फक्त या क्षेत्रातल्या करिअरशी तुमची केमिस्ट्री जुळणे म्हणजेच नाळ जुळणे महत्त्वाचे.

anaokarm@yahoo.co.in