लोकसत्ता मार्ग यशाचाह्ण या करिअर कार्यशाळेमध्ये खेळातील करिअरविषयी बोलण्यासाठी वर्षां उपाध्ये आणि नीता ताटके या क्रीडातज्ज्ञ आल्या होत्या. नीता ताटके यांनी क्रीडा-मानसशास्त्रात पदवी मिळवली असून त्या मल्लखांब आणि योगासनांतील राष्ट्रीय खेळाडू आहेत. तर तर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या वर्षां उपाध्ये या जिम्नॅस्टिक्समधील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला पंच आणि प्रशिक्षक आहेत.

भारतामध्ये आता खेळाचे एक वेगळे स्वतंत्र क्षेत्र तयार होत आहे, ही आनंदाची बाब आहे. खेळाडू म्हणून असलेल्या करिअरसोबतच खेळाडूंसाठी आहारतज्ज्ञ, औषधे, मसाज आणि व्यायाम देणारे प्रशिक्षक या करिअर्सकडेही लोक लक्ष देऊ लागले आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांत पदक मिळाले नाही तर त्या खेळाला महत्त्व द्यायचे नाही, अशी काहीशी मानसिकता झाली होती. नुकत्याच झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये दीपा कर्मकारने जिम्नॅस्टिकमध्ये दाखवलेले यश किंवा सिंधूचे यश यामुळे आपण खेळाकडे पुन्हा एकदा लक्षपूर्वक पाहू शकत आहोत. या खेळाडूंचा सराव हाच फक्त त्यांच्या यशातील महत्त्वाचा घटक नसतो. त्या जोडीला त्यांचा दिवसभरातील आहार, औषधे, प्रशिक्षण, स्पर्धा प्रशिक्षण, मानसिकता याचाही महत्त्वाचा वाटा असतो. खेळाडूच्या यशामागे ही एक मोठी टीम कार्यरत असते. प्रशिक्षकाला या सगळ्यांची गरज भासतेच. त्यामुळे त्यातही करिअरच्या उत्तम संधी आहेत.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Anti-Maoist operations in India influence of Naxalism
छत्तीसगडमध्ये १८ नक्षलींचा खात्मा; देशात कुठे आहे नक्षलवादाचा प्रभाव?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक

क्रीडाशास्त्रातील काही बाबींकडे विद्यार्थी आणि पालक  फार दुर्लक्ष करताना दिसतात. खेळासाठी मैदानावर जाताना आधी वॉर्मअप करून शरीर खेळाकरिता तयार करणे आवश्यक असते. ते न केल्यास त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. खेळ संपल्यानंतरही शास्त्रशुद्ध पद्धतीने शरीराला विश्रांती देऊन मगच तिथून निघणे गरजेचे आहे. पण आपल्याकडे अनेक जण मॅच संपली की लगेच प्रवासाला लागतात. हे चुकीचे आहे. पण अशाप्रकारचे शास्त्र शिकवणाऱ्या क्रीडाशास्त्रातील तज्ज्ञांची खेळाच्या क्षेत्रात गरज आहे. या अभ्यासक्रमासाठी एमबीबीएस पदवी घेतलेले विद्यार्थी पात्र ठरतात.

क्रीडा प्रशिक्षक

अलीकडे प्रशिक्षकांना मोठय़ा प्रमाणात मागणी उपलब्ध होऊ लागली आहे. पूर्वी प्रशिक्षक म्हणजे केवळ क्रिकेटमधील प्रशिक्षक अशी व्याख्या होती. आता ती बदलली आहे. क्रिकेटपलीकडे असलेल्या खेळातही प्रशिक्षकांना चांगला मान मिळू लागला आहे. मात्र प्रशिक्षण हे दर्जात्मक असावे. प्रशिक्षणासोबतच सराव कसा करावा, सरावाआधी कोणता आहार घ्यावा, नंतर कोणता आहार घ्यावा, विश्रांती कशी घ्यावी, याचेही मार्गदर्शन आवश्यक असते. येथे आहारतज्ज्ञ मदत करतात. विज्ञानात पदवी घेतल्यानंतर आहारासंबंधींचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. खासगी संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध असून सहा महिने ते एक वर्ष इतका त्यांचा कालावधी असतो. त्यानंतर प्रमाणपत्रही मिळते. अशा आहारतज्ज्ञांची सध्या क्रीडाविश्वाला गरज आहे. त्यामुळे यात उत्तम करिअर घडू शकते.

क्रीडा व्यवस्थापन

खेळ व्यवस्थापनासाठी मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. एक वर्षांचा ओळख अभ्यासक्रम घेतला जातो. त्यात खेळ व्यवस्थापन नेमके काय आहे, हे समजावले जाते. या अभ्यासक्रमामध्ये स्पॉन्सरशिप कशी आणायची, आयपीएलसारखे इव्हेंट कसे आयोजित करावे, ग्राहकाशी संवाद कसा साधावा या गोष्टी शिकवल्या जातात. भारतात असे अनेक खासगी अभ्यासक्रम सुरू आहेत. या गोष्टीचा अधिक सखोल अभ्यास करायचा असल्यास ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वित्र्झलड येथे या संबंधित अभ्यासक्रम आहेत. त्यासाठी काही परीक्षा द्याव्या लागतात. त्यांनी पाठवलेली प्रश्नावली भरून द्यावी लागते. आपला बायोडेटा आणि अनुभवाचे प्रमाणपत्रही द्यावे लागते. काही वेळा तर विम्बल्डन, ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी काम करण्याचीही संधी मिळू शकते.

क्रीडा मानसशास्त्र

खेळासंबंधीच्या करिअरमधील एक महत्त्वाची शाखा म्हणजे क्रीडा-मानसशास्त्र. क्रीडा-मानसशास्त्राचा उपयोग शारीरिक आणि मानसिक धैर्य वाढवणे या दोन गोष्टींसाठी होतो. खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी त्याचा उत्तम उपयोग होतो. तसेच आपले शारीरिक आणि मानसिक धैर्य वाढवण्यासाठीदेखील त्याचा उपयोग होतो. क्रीडा-मानसशास्त्रातील हे ज्ञान सर्वसामान्यांनाही उपयोगाचे आहे.  हे क्षेत्र अ‍ॅप्लिकेशन बेस आहे. या क्षेत्राचा उपयोग काही तरी चांगले करण्यासाठी आहे. त्यामुळे ते फक्त खेळाडूंपुरते मर्यादित नाही. आपल्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी समुपदेशनाचा उपयोग होतो. शिवाय हे करिअर करत असताना तुम्ही स्वत:च्या वेळा निश्चित करू शकता. या अभ्यासक्रमासाठी भारतात फार संधी नाहीत. पण अमेरिका, इंग्लंड, लंडन या ठिकाणी याचे एम.एस. आणि पीएच.डी. असे अभ्यासक्रम आहेत. अमेरिकेत या अभ्यासक्रमासाठी पूर्ण शिष्यवृत्ती आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधकांकडून शिकता येते. भारतातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच असताना क्रीडा-मानसशास्त्राविषयी विविध  संशोधनपर शोधनिबंध, प्रकल्प

सादर केल्यास परदेशातील अभ्यासक्रमासाठी त्वरित शिष्यवृत्ती उपलब्ध होऊ शकते. परदेशात शिक्षण घेऊन भारतात आलेल्या प्रशिक्षकांना मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत.

खेळाचे क्षेत्र आता विस्तारत आहे. त्यामुळे विविध विषयातील कुशल व्यक्तींची इथे गरज भासते आहे. अगदी इव्हेंट मॅनेजमेंटपासून ते आहारतज्ज्ञापर्यंत प्रत्येकालाच यात मोठय़ा संधी आहेत.  यामध्ये पूर्णवेळच नव्हे तर अर्धवेळ करिअर करण्याचाही चांगला पर्याय आहे.

 – नीता ताटके

तुम्हाला खेळाची आवड असेल पण पूर्णवेळ खेळाडू होणे, शक्य नसेल  तरीही तुम्ही या क्षेत्रात उत्तम काम करू शकता. तुम्ही क्रीडा आहारतज्ज्ञ, क्रीडाशास्त्रातील तज्ज्ञ होऊ शकता; परंतु खेळण्याचा अनुभव असल्यास अधिक उत्तम. कारण निवड प्रक्रियेच्या वेळी त्या व्यक्तीला प्राधान्य मिळण्याची शक्यता जास्त असते.

वर्षां उपाध्ये