मी सध्या कलाशाखेतील पदवीच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला पुढे एमबीए करता येईल का? त्यासाठी कोणती परीक्षा असते. ती कशा प्रकारे द्यावी लागेल? त्याची प्रक्रिया कशी असते?

प्रभाकर होळकर

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
Loksatta explained What is the dress code for teachers in the state
विश्लेषण: राज्यातील शिक्षकांना पेहरावसंहिता कशासाठी?

एमबीए प्रवेशासाठी कोणत्याही विषयातील पदवी ही आवश्यक अर्हता आहे.  पुढच्या वर्षी पदवी मिळवल्यानंतर तुला एमबीए करता येईल. आपल्या देशात एमबीए प्रवेशासाठी विविध चाळणी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. यामध्ये कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट-कॅट, कॉमन मॅनजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट-सीमॅट, झेव्हियर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट-झ्ॉट, मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट-मॅट, सिम्बॉयसीस नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, नरसी मोनाजी मॅनजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- एनमॅट, एमएच-सीईटी-एमबीए / एमएमएस यापैकी एक किंवा सगळ्या परीक्षा द्याव्या लागतील.

माझा भाऊ  इयत्ता ११वी विज्ञान शाखेत शिकत आहे. त्याला आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामध्ये जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्याला काय करावे लागेल?

शिवराज गोडाळे

तुमच्या भावाला इतक्या वेगळ्या विषयात करिअर करावेसे वाटणे, हीच मुळात उत्तम गोष्ट आहे. पण सर्वप्रथम तो हे नक्की का म्हणत आहे, हे समजून घ्या. त्याला इतिहासात रस, गती आणि आवड आहे का, याची माहिती घ्या. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात जाण्यासाठी इतिहास विषयातील पदव्युत्तर पदवी वा त्यापुढील अभ्यासक्रम म्हणजे पीएचडी आवश्यक आहे. या विभागातील पदे गरज व आवश्यक्तेनुसार वेळोवेळी जाहीर केली जातात. त्यासाठी अर्ज करणे, मुलाखत/लेखी परीक्षा हे सोपस्कार पार पाडावे लागतात. अत्यल्प पदे आणि स्पर्धा खूप मोठी अशी स्थिती असते. ही बाब लक्षात ठेवावी.

मी सांगली येथे बी.एससीच्या दुसऱ्या वर्षांला शिकत आहे. माझे महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठाला संलग्न आहे. बी.एससी करता करता मला शिवाजी विद्यापीठातून किंवा दुसऱ्या विद्यापीठातून बी.ए. करता येईल का ?

मुक्ता लांडगे

अधिकृत मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमासाठी तुला प्रवेश घेता येईल. त्याचा अभ्यासही करता येईल. पण मुख्य प्रश्न असा आहे की, बी.एस्सी करत असताना अधिक बी.ए. कशासाठी करायचे? त्याचे खास कारण असेल तर ठीक आहे. नाहीतर एकाचवेळी दोन्ही अभ्यासक्रमांकडे नीट लक्ष देता येईलच असे नाही. त्यातून  नेमके कितपत ज्ञान मिळेल, याचीही शंकाच आहे. शिवाय परीक्षेतील गुणांवरही परिणाम होऊ  शकतो. ही बाब लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)