वाढत्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे समाजात अनेक बदल होत आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक हा घटक काहीसा दुर्लक्षितच दिसतो.  वृद्धांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वृद्धांवरील अत्याचार वाढताना दिसत आहेत. वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. म्हणूनच यासाठी समाजाच्या सर्वच स्तरांतून कार्य होणे गरजेचे आहे.

अनेक व्यक्तींना निवृत्तीनंतर काय करावे, हा प्रश्न पडतो. निवृत्तीनंतर बरेच काही करायचे असते परंतु मार्गच सापडत नाही. यासाठीच निर्मला निकेतनतर्फे समाजकार्याचे अभ्यासक्रम चालवले जातात. कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन, विस्तार केंद्र गोरेगाव येथे अशा अल्पकालीन अभ्यासक्रमांची सुरुवात झालेली आहे. सर्वच वयोगटांतील, स्तरांतील व्यक्तींना समाजाच्या सर्वागीण विकासासाठी कशाप्रकारे हातभार लावता येईल याविषयी येथे माहिती दिली जाते. तसेच समाजकार्यामधील करिअरविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळेल.

याचसोबत निर्मला निकेतनतर्फे एमएसडब्ल्यू, बीडब्ल्यू, पीजी डिप्लोमा इन सीएसआर, पॅरा प्रोफेशनल ट्रेनिंग इन सोशल वर्क, सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स, सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन सोशल वर्क फॉर सीनिअर सिटीझन्स, सर्टिफिकेट इन बेसिक स्किल्स इन रिसर्च फॉर फिल्ड प्रॅक्टिशनर अशाप्रकारेच अनेक अभ्यासक्रम चालवले जातात.

प्रवेशप्रक्रिया आणि अर्जाच्या माहितीसाठी संपर्क

निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क, विस्तार केंद्र, सेंट पायस कॉलेज कॅम्पस,

वीरवाणी रोड, गेट नं. २, गोरेगाव पूर्व, मुंबई- ४०००६३.

ई-मेल – nnvirtuallearning@gmail.com / nnextension.centre@gmail.com ,

दूरध्वनी  – २९२७१४३३/२९२७०९८१ /९९३०९९१९५३.