सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक्स, हैदराबाद येथे रिसर्च स्कॉलर्स योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या संशोधनपर पीएचडीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा एमबीबीएस सारखी पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय सीएसआयआर, यूजीसी, डीबीटी, आयसीएसआर, इन्स्पायर नेट – जेआरएफ यूजीसीसारखी पात्रता परीक्षा दिलेली असावी.

pune mba cet marathi news, mca cet marathi news
आणखी दोन अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे, अर्ज नोंदणीसाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत
ntpc and shipping corporation disinvestment
एनटीपीसी, शिपिंग कॉर्पोरेशनच्या निर्गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य, निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कालावधीत भागविक्री शक्य
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने २१ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात येईल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांची २२ जानेवारी २०१८ रोजी मुलाखत घेण्यात येऊन त्याआधारे त्यांची सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक्स, हैदराबाद येथे संशोधनपर पीएचडीसाठी निवड करण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून खुल्या वर्ग गटातील उमेदवारांनी ५०० रु., आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीयांनी २५० रु. तर राखीव वर्गगटातील उमेदवारांनी १२५ रु. प्रवेश शुल्क म्हणून भरणे आवश्यक आहे.

अर्जाचा नमुना व तपशील – अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक्सची जाहिरात पाहावी, दूरध्वनी क्र. ०४०- २४४४९३०९ वर संपर्क साधावा अथवा सेंटरच्या http://www.cdfd.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक्स, उप्पल वॉटर टँक, टी.ई. बिल्डिंग, उप्पल, हैदराबाद- ५०००३९ या पत्त्यावर ८ डिसेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.