News Flash

नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटचा अभ्यासक्रम

अर्जदारांच्या पदविका परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीनुसार त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातंर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणाऱ्या खालील अभ्यासक्रम प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
अभ्यासक्रम व उपलब्ध जागा– थर्मल पॉवर प्लन्ट इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध जागा ८०.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी मेकॅनिकल अथवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
विशेष सूचना- अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार
राखीव आहेत.
निवड पद्धती- अर्जदारांच्या पदविका परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीनुसार त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
निवास व्यवस्था- अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांपैकी गरजू विद्यार्थ्यांना निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जदारांनी आपल्या प्रवेश अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ४०० रु. चा एनपीटीआय बद्रपूर यांच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ मे ते ३ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट- नवी दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.nptidelhi.net, www.npti.in या संकेतस्थळांना भेट द्यावी, अथवा दूरध्वनी क्र. ०११-२६९४०७२२ वर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज प्रोग्रॅम डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बद्रपूर, नवी दिल्ली- ११० ०४४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१६ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:01 am

Web Title: courses by national power training institute
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन- ३ तंत्रज्ञान
2 एमपीएससी मंत्र : मानवी हक्क व संसाधन : मूलभूत अभ्यास
3 वेष्टन उद्योगातील संधी
Just Now!
X