केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अ‍ॅण्ड ट्रेनिंग सांस्कृतिक क्षेत्रातील शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०१८ या शैक्षणिक सत्रासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.

उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या व तपशील- योजनेअंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या ६५० असून त्यामथ्ये ३७५ शिष्यवृत्ती खुल्या वर्ग गटातील उमेदवारांसाठी, १२५ शिष्यवृत्ती परंपरागत व कौटुंबिक कलाविषयक कारागिरांसाठी, १०० शिष्यवृत्ती वनवासी व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी, २० शिष्यवृत्ती दिव्यांगजन उमेदवारांसाठी तर ३० शिष्यवृत्ती कलात्मक लिखाण व साहित्य विषयक क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील- शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक ३६०० रु. ची शैक्षणिक शिष्यवृत्ती व शैक्षणिक सत्रासाठी दरवर्षी ९००० रु. ची रक्कम देय असेल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अ‍ॅण्ड ट्रेनिंग सांस्कृतिक क्षेत्रातील शैक्षणिक शिष्यवृत्ती २०१८ ची जाहिरात पहावी अथवा सेंटरच्या www.ccrtindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस ट्रेनिंग, १५ ए, सेक्टर- ६, द्वारका, नवी दिल्ली ११००७५ या पत्त्यावर ३१ जानेवारी २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.