News Flash

आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसहभाग

विभागस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते.

भूकंप, महापूर, दुष्काळ इत्यादी आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषत: अल्पवयीन बालके, वृद्ध, महिला तसेच अपंग यांना कमीत कमी त्रास होईल याची खातरजमा करण्यासाठी स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तितकाच उत्स्फूर्तपणे लोकसहभाग मिळणे आवश्यक ठरते. विभागस्तरावरून करण्यात येत असलेल्या उपाययोजना-.

  • विभागस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते. याचप्रमाणे जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नियंत्रण कक्षाची सेवा २४ तास उपलब्ध असते.
  • पूरपरिस्थितीमुळे साथ रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दूरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दूरसंचार विभाग, रस्त्याने वाहतुकीचा संपर्क असावा यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
  • आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, होमगार्डस्, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदींचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनीदेखील हिरिरीने पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याची गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 12:32 am

Web Title: disaster management
Next Stories
1 नोकरीची संधी
2 यूपीएससीची तयारी : यूपीएससीच्या तयारीचे बिगूल
3 वेगळय़ा वाटा : डिजिटल एमबीए
Just Now!
X