News Flash

हुंडा प्रतिबंधक कायदा

प्रचलित रूढी-परंपरेविरुद्ध जनजगृतीची एक प्रकारची लढाईच आहे.

 

हुंडय़ासारखी सामाजिक समस्या स्वातंत्र्यनंतर आजही ज्वलंत आहे. आजही आपण हुंडय़ापायी नववधूंचा छळ, हुंडाबळीच्या घटना ऐकतो. या पद्धतीचे निर्मूलन करणे म्हणजे प्रचलित रूढी-परंपरेविरुद्ध जनजगृतीची एक प्रकारची लढाईच आहे.

हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१

या अधिनियमातील कलम २ अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या अशी- विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई-वडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने किंवा तत्पूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा कबूल केलेली कोणतीही संपत्ती अथवा मूल्यवान रोख असा आहे.

हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शिक्षा

  • कलम ३ अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी ५ वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची आणि कमीत कमी रुपये १५,०००/- अथवा अशा हुंडय़ाच्या मूल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
  • कलम ४ अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यास कमीत कमी ६ महिने परंतु २ वषापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि रु. १०,०००/- पर्यत असू शकेल इतकी दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
  • कलम ४ अ अन्वये कोणत्याही व्यक्तींने हुंडय़ासंदर्भात जाहिरात छापल्यास किंवा प्रसिद्ध केल्यास कमीत कमी ६ महिने परंतु ५ वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची किंवा रुपये १५,०००/- पर्यंत असू शकेल इतकी दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 12:32 am

Web Title: dowry prohibition act
Next Stories
1 नोकरीची संधी
2 एमपीएससी मंत्र : अर्थसंकल्प राज्याचा
3 वेगळय़ा वाटा : कार्य व्यवस्थापनाचे शास्त्र
Just Now!
X