मागच्या लेखामध्ये आपण  चित्रकला शिक्षणासंबंधी एकंदरीत मानसिकतेचा, त्यातील भीतीचा आणि ती निर्माण होण्यामागच्या कारणांची चर्चा केली. शिक्षण घेण्याआधीच सुरू होणाऱ्या वैचारिक गोंधळाबाबत ऊहापोह केला. आज आपण चित्रकला शिक्षण आणि करिअर याचा विचार करताना, चित्रकला शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची संधी  याबाबत विचार करू. हा विचार करताना सोबतच्या आकृतीकडे लक्ष देऊ. या आकृतीमध्ये तीन वर्तुळे आहेत, ती एकमेकांना आच्छादतात. त्यांच्या आच्छादण्यातून आपले शिक्षण, कारकीर्द (करिअर) आणि छंद याबद्दल काही गोष्टी सुचवल्या गेल्या आहेत. ज्या समजून घेणे गरजेचे आहे.

नोकरीसंबंधी असे होते की, अमुक एका व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला नोकरीची संधी उपलब्ध झाली नाही तर अमुक या क्षेत्राला वाव नाही, असे मत तयार होऊ शकते. चित्रकलेबद्दलही असेच होते. त्यामुळे नोकरीसंबंधी विचार करताना हा प्रश्न येतो की त्याकडे पाहायचे कसे? नोकरी म्हणजे शिक्षणातून उपलब्ध झालेल्या ज्ञानाचे उपयोजन करणे आणि त्यातून अर्थार्जन करणे. किंवा दर महिन्याला विशिष्ट रकमेची आर्थिक शाश्वती म्हणजे नोकरी? आपल्याकडील नैसर्गिक क्षमता, शिक्षणामुळे प्राप्त झालेली क्षमता, उपयोजन आणि त्यातून मिळणारा निर्मितीचा आनंद, समाधान व आíथक मोबदला या गोष्टी नोकरी किंवा करिअरमध्ये महत्त्वाच्या ठरतात. सोबतची आकृती त्याकडे बोट दाखवते. नोकरी आणि करिअरमध्ये ३ गोष्टी असतात. १) तुम्हाला करता येत असलेले काम, २) तुम्हाला करता येत असलेले आणि आवडणारे काम, ३) समाजाची गरज.

Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

जर एखादे काम तुम्हाला करता येत असेल, आवडत असेल पण ते समाजाची गरज नसेल तर तो तुमचा छंद बनतो. तुम्हाला येणारे काम समाजाची गरज असेल तर तुम्हाला नोकरी मिळते. आणि तुम्हाला एखादे काम करायला फार आवडते, पण येत नाही. शिवाय समाजाला याची गरज आहे. मग तुम्ही ते दुसरीकडून करून घेता. त्याचा व्यवसाय बनतो. जे तुम्हाला स्वत:ला करता येते. आवडते, समाजालाही त्याची गरज असते, त्याची दीर्घ कारकीर्द बनू शकते.

या गोष्टी खूपच विस्ताराने आणि स्पष्ट मांडल्या आहेत. पण नोकरीच्या शोधात असताना आपण इतका स्पष्ट विचार करू शकत नाही. तेव्हा आपल्याला त्वरित संधी हवी असते. पण हा विचार गरजेचा आहे, कारण नोकरी व आपले कौशल्य वापरण्याची संधी ही समाज काय अवस्थेत आहे, यावर मिळू शकते. सध्या भारतात डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया अशा गोष्टींचे वारे वाहत आहेत. भारताने आर्थिक महासत्ता बनण्यासाठी काही गोष्टी करू घातल्या आहेत. अशा वेळी साहजिकच शिक्षणाकडे वेगळ्या भूमिकेने पाहिले जाते, त्याचा वेगळा विचार केला जातो. भारतात नोकरी करणारा वर्ग तयार होण्यापेक्षा नवनिर्मिती करणारी मने, विद्यार्थी, अभ्यासक, शास्त्रज्ञ, डिझायनर, अर्थतज्ज्ञ, शेतकरी आदी तयार होतील, यासाठी बदल घडावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी शालेय पातळीपासून बदल व्हायला हवे. त्याकरता दृश्यकला, संगीत, नृत्य, नाटय़ यांचे शिक्षण महत्त्वाचे आणि अनिवार्य असावे, असे शिक्षण धोरणे ठरवणारी जगभरातील मंडळी म्हणत आहेत. एकंदरीत चित्रकला शिक्षण देणे, घेणे दोन्ही खूप महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता निर्माण करणे, वृद्धिंगत करणे या गोष्टी यामुळे होतील, असे मानले जाते. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, पारंपरिक चित्रकला, त्यातील तंत्रावरील भर, कौशल्य निर्मितीवरचे लक्ष, यापेक्षा खूप वेगळ्या विचारप्रवर्तक अशा कला शिक्षणाला महत्त्व येणार आहे. हे शिकवणारा शिक्षक वेगळा असेल.

कलेतील शिक्षणपद्धतीत आतापर्यंतची परिस्थिती फार वेगळी होती. गुरुशिष्य परंपरा, कलासाधना अशा संकल्पनांवर आधारित शिक्षण व्यवहार केला जात होता. यात शिक्षकाने कोणते विषय कसे शिकवायचे याचे ढाचे ठरले होते. अनेक वर्षे त्यामध्ये काही आव्हानात्मक विचार झालेला नव्हता. त्यामुळे या कामाचा एक साचा नक्की होता. पण नजीकच्या भविष्यात हे चित्र बदललेले असेल. कला शिक्षक तंत्रज्ञान आणि डिझाइन यांनी व्यापलेल्या जगात शिकवणार आहे. त्याला वैयक्तिक अभिव्यक्तीपेक्षा किंवा त्यासोबतच कला ही एक भाषा म्हणून विचारांची भाषा म्हणून शिकवण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे साहजिकच शिकवण्याच्या पद्धती बदलतील.  शिक्षणाची साधने ही तंत्रस्नेही असतील. कला शिक्षणाच्या काही प्रणाली निश्चित कराव्या लागतील. इंग्रजी भाषा ही अनिवार्य ठरेल. या सगळ्या गोष्टी आवडणाऱ्यांसाठी कलाशिक्षक म्हणून करिअर करणे, ही योग्य गोष्ट असेल. सध्या उपलब्ध असलेले कोर्स.

ATD – आर्ट टीचर डिप्लोमा-  हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा आहे. तो बारावीनंतर करता येतो.तो पूर्ण केल्यानंतर पहिली ते दहावीपर्यंत चित्रकला हा विषय SSC /ICSE /CBSE अशा कोणत्याही बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळेत शिकवता येतो.

डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन हा अभ्यासक्रम बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स किंवा गव्‍‌र्हर्न्मेंट डिप्लोमा इन आर्ट हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही करता येतो. तो पूर्ण केलेल्या व्यक्तीला शाळेसोबतच कला महाविद्यालयांतही शिकवता येते. गेल्या काही वर्षांत मुंबई, पुणे, नागपूर अशा भारतातील अनेक शहरांत IGCSE / IB बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळा सुरू झाल्या आहेत. तिथे डिग्री अभ्यासक्रम (BFA /MFA) पूर्ण झालेल्या शिक्षकांची निवड केली गेली असे दिसून आले आहे. एकंदरीत चित्रकला शिक्षक होणे हे आर्थिक स्थिरता आणि आव्हाने यांचं एक मिश्रण असेल.

लेखक चित्रकार, समीक्षक व रचनासंसद अकादमी ऑफ फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स मुंबईचे प्रिन्सिपल आहेत.