केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) (जाहिरात क्र. ६/२०१७) पुढील पदांची सरळ सेवा भरती.

(१) डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) मध्ये सहा. स्टोअर्स ऑफिसर्स.

पात्रता – (अ) पदवी उत्तीर्ण, (ब) ३ वर्षांचा टेक्निकल स्टोअर्सची खरेदी/पुरवठा या कामाचा अनुभव. वयोमर्यादा – ३०वष्रे. विकलांग (ओए/ओएल/पीबी/(एचआय/पीडी)) हेदेखील पात्र आहेत.

वेतन – रु. ६१,२३४/- दरमहा.

(२) चिफ लेबर कमिशनर (सेंट्रल) यांचे आस्थापनेवर एकूण ३३ ‘लेबर इन्फोर्समेंट ऑफिसर’ पदांची भरती. पात्रता – (अ) वाणिज्य/अर्थशास्त्र/सोशिऑलॉजी/सोशल वर्क या विषयांतील पदवी. (ब) कायदा / लेबर रिलेशन्स / लेबर वेल्फेअर / लेबर लॉज / सोशिऑलॉजी / कॉमर्स / सोशलवर्क / वेल्फेअर / बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन / पर्सनल मॅनेजमेंट इ. विषयांतील पदव्युत्तर पदवी/पदविका. इष्ट पात्रता – लेबर लॉज / लेबर वेल्फेअर / लेबर रिलेशन्स / पर्सनल मॅनेजमेंट कामाचा अनुभव. वेतन – दरमहा रु. ६१,२३४/-. ऑनलाइन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन (ओआरए) <http://www.upsconline.nic.in/> या संकेतस्थळावर दि. १३ एप्रिल २०१७ (रात्री २३.५९) पर्यंत करावेत.

अणुऊर्जा विभाग (डीएई), हेवी वॉटर बोर्ड, अणुशक्तीनगर, मुंबईमध्ये पुढील पदांची भरती.

१) डेप्यु. चिफ फायर ऑफिसर (२ पदे),

२) स्टेशन ऑफिसर (१ पद),

३) सब ऑफिसर (६ पदे),

४) लििडग फायरमन (११ पदे),

५) फायरमन (२३ पदे),

६) ड्रायव्हर कम ऑपरेटर (३ पदे),

७) ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) (१५ पदे). विस्तृत जाहिरात http://www.hwb.gov.in <http://www.hwb.gov.in/>  या संकेतस्थळावर पाहता येईल.

(५) फायरमन पदासाठी पात्रता – १० वी उत्तीर्ण स्टेट फायर ट्रेिनग सेंटर्सकडील सर्टििफकेट कोर्स. (हेवी वेहिकल ड्रायिव्हग लायसन्स असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.)

(७) ड्रायव्हर सामान्य श्रेणी पदासाठी पात्रता – १० वी उत्तीर्ण हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना असावा.  ३ वर्षांचा अनुभव. तसेच वाहनांची देखभाल व दुरुस्ती करण्यास सक्षम असावा.

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज <http://www.hwb.gov.in/>  ÎIYUF hwb.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. २५ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स सायंटिफिक रिसर्च (जेएनसीएएसआर), बंगलोर (अभिमत विद्यापीठ) – पीएच.डी. रिसर्च प्रवेश २०१७-१८  (१) (सायन्स आणि इंजिनीअिरगमधील) एमएस/पीएच.डी. प्रोग्राम.

पात्रता – नेट/जेआरएफ (सीएसआयआर/यूजीसी फेलोशीप किंवा डीबीटी/आयसीएमआर- जेआरएफ /इन्स्पायर – जेआरएफ किंवा गेट/जेईएसटी/जीपॅट उत्तीर्ण.) (२) इन्टिग्रेटेड पीएच.डी. प्रोग्रॅम – (मटेरियल्स सायन्स, केमिकल सायन्स आणि बायोलॉजिकल सायन्स). पात्रता – संबंधित विषयांत किमान ५५% गुणांसह पदवी (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र). ऑनलाइन अर्ज http://www.jncasr.ac.in/admit  वर दि. १६ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद (डिपार्टमेंट ऑफ स्पेस, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय अनुसंधान संस्था) येथे अ‍ॅस्ट्रॉनॉमी, अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, फिजिक्स, स्पेस अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्सेस इ. विषयांत ज्युनियर रिसर्च फेलोशीप घेऊन पीएच.डी. करण्याची सुवर्णसंधी.

पात्रता – (१) फिजिक्स, केमिस्ट्री, जिऑलॉजी, स्पेस सायन्स इ. मधील पदवी किमान प्रथम वर्गात उत्तीर्ण. (सन २०१५व नंतर) (२) संबंधित विषयासह सीएस आयआर- यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, एनईटी – जेआरएफ, ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअिरग (जीएटीई), जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट (जेईएसटी – २०१७) यापकी एक परीक्षा उत्तीर्ण. फेलोशीप दरमहा रु. २५,०००/- दिले जाईल. वयोमर्यादा – २५ वष्रे. (अजा/अज – ३० वष्रे, इमाव – २८ वष्रे) ऑनलाइन अर्ज <https://www.prl.res.in/&gt;   या संकेतस्थळावर १६ एप्रिल २०१७पर्यंत करावेत.