उमेदवार रसायनशास्त्र अथवा औद्योगिक रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत अथवा ते केमिकल टेक्नॉलॉजी अथवा केमिकल इंजिनीअिरगमधील पदविकाधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २९ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनीमध्ये ज्युनिअर फायरमन- सिव्हिलच्या ३ जागा
उमेदवार सिव्हिल इंजिनीअिरगमधील पदविकाधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ४० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनीची जाहिरात पाहावी अथवा नाल्कोच्या http://www.nalcoindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.

कामगार राज्य विमा महामंडळात मुंबई येथे उच्च श्रेणी लिपिकांसाठी ४ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कामगार आरोग्य विमा महामंडळाची जाहिरात पाहावी अथवा ईएसआयच्या http://www.esicmaharashatra.gov.in/recruitment results  अथवा http://www.esic.nic.in/recruitment  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज क्षेत्रीय निदेशक, कामगार राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, १०८, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३ या पत्त्यावर ३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

डॉकयार्ड अ‍ॅपरेंटिस स्कूल, मुंबई येथे शिकाऊ उमेदवारांच्या ३३५ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ५ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली डॉकयार्ड अ‍ॅपरेंटिस स्कूल, मुंबईची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह साध्या टपालाने पोस्ट ऑफिस बॉक्स नं. १००३५, जीपीओ, मुंबई- ४००००१ या पत्त्यावर ३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

कामगार राज्य विमा महामंडळात चंदिगढ येथे वरिष्ठ लिपिकांच्या ४ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कामगार राज्य विमा महामंडळ, चंदिगढची जाहिरात पाहावी अथवा  http://www.esicpunjab.org अथवा http://www.esic.nic.in/ recruitment या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज रिजनल डायरेक्टर, एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, मध्य मार्ग सेक्टर-१९ ए, चंदिगढ या पत्त्यावर ३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

कामगार राज्य विमा महामंडळ, अहमदाबाद येथे वरिष्ठ कारकुनांच्या ४ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली कामगार राज्य विमा महामंडळाची जाहिरात पाहावी अथवा महामंडळाच्या http://www.esicgujrat.in अथवा http://www.esic.nic.in/recruitment  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज रिजनल डायरेक्टर, एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, आश्रम रोड, अहमदाबाद- ३८००१४ या पत्त्यावर
३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

इस्रो- अहमदाबाद येथे टेक्निशियन- इलेक्ट्रिशियनच्या १६ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इस्रोची जाहिरात पाहावी अथवा इस्रोच्या http://www.sac.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज पाठवावेत.

आगरकर संशोधन संस्था, पुणे येथे संशोधकांच्या २ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आगरकर संशोधन संस्था, पुणेची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज संचालक, आगरकर संशोधन संस्था, जी. जी. आगरकर मार्ग, पुणे- ४११००४ या पत्त्यावर २ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट, पुणे येथे वरिष्ठ कारकुनांच्या २ जागा
वयोमर्यादा २६ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ftiindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कुलसचिव, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे- ४११००४ या पत्त्यावर २ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

इंडियन ऑईलमध्ये ज्युनिअर ऑफिस अटेंडंटच्या २० जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा २६ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑईलची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.iocl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ८५२, जीपीओ, कोलकाता- ७००००१ या पत्त्यावर २ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

भाभा अणू संशोधन केंद्रात संशोधन साहाय्यकांच्या ३ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली भाभा अणू संशोधन केंद्राची जाहिरात पाहावी अथवा बीएआरसीच्या http://www.barcrecruit.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३ नोव्हेंबर २०१५
पर्यंत पाठवावेत.