13 December 2018

News Flash

युपीएससीची तयारी : नैतिक विचारसरणीचा अभ्यास

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे विचारलेले प्रश्न व त्यांची नैतिक विचारसरणींनुसार विभागणी देत आहे.

मागील काही लेखांमध्ये आपण विविध नैतिक विचारसरणींचा अभ्यास केला. यूपीएससीच्या सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरमधील, विभाग ‘अ’ मध्ये या विचारसरणींवर आधारित अनेकदा थेट प्रश्न विचारले जातात. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे विचारलेले प्रश्न व त्यांची नैतिक विचारसरणींनुसार विभागणी देत आहे. याचा उमेदवारांना निश्चित फायदा होईल.

(अ) उपयुक्ततावादी विचारसरणी

१) ‘The good of an individual is contained in the good of all.’ What do you understand by this statement? How can this principle beimplemented in public life? (2013, 150 words,10 marks)

१) ‘व्यक्तीचे हित समाजातील इतरांच्या हितात सामावलेले असते.’ वरील विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ कोणता? सार्वजनिक आयुष्यामध्ये या तत्त्वाचा वापर कसा केला जाऊ शकतो? (२०१३, १५० शब्द, १० गुण)

२) All human beings aspire for happiness. Do you agree? What does happiness mean to you? Explain with examples. (2014, 150 words, 10 marks)

२) सर्व व्यक्तींना आनंदाची अपेक्षा असते. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? आनंदाची तुमची संकल्पना कोणती? उदाहरणे देऊन स्पष्ट करा. (२०१४,  १५० शब्द, १० गुण)

 (ब) कर्तव्यवादी विचारसरणी

३) ‘Human beings should always be treated as ‘ends’ in themselves and never as merely means.’ Explain the meaning and significance of this statement, giving its implications in the modern techno-economic society. (2014, 150 words, 10 marks)

३) ‘व्यक्तींचा कधीही साधन म्हणून विचार न करता केवळ ‘साध्य’ म्हणूनच विचार केला गेला पाहिजे.’ तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या आधुनिक समाजासाठी वरील विधानाचा अर्थ, महत्त्व आणि परिणाम स्पष्ट करा. (२०१४, १५० शब्द, १० गुण)

४) ‘There is enough on this earth for every one’s need but for no one’s greed.’ – Mahatma Gandhi. Bring out what it means to you in the present context : (2013, 150 words, 10 marks)

४) ‘पृथ्वीवर प्रत्येकाची गरज भागवण्याइतकी संसाधने नक्कीच आहेत; मात्र त्यातून एकाचीही हाव भागणार नाही.’

– महात्मा गांधी. वरील विधानाचा, तुमच्या मते, सध्याच्या स्थितीशी असणारा सुसंगत संदर्भ कोणता हे स्पष्ट करा.

(क) सद्गुणांवर आधारित विचारणी

५) ‘Nearly all men can withstand adversity, but if you want to test a man’s character, give him power’. – Abraham Lincoln. Bring out what it means to you in the present context : (2013,150 words, 10 marks)

५) ‘‘जवळजवळ सर्वच जण प्रतिकूलतेचा सामना करू शकतात; मात्र तुम्हाला जर का कुणाचे शील तपासायचे असेल तर त्यांना सत्ता देऊन पाहा.’’ – अब्राहम िलकन. वरील विधानाचा, तुमच्या मते, सध्याच्या स्थितीशी असणारा सुसंगत संदर्भ कोणता हे स्पष्ट करा. (२०१३, १५० शब्द, १० गुण)

६) What do you understand by the following terms in the context of public service?

(i) Courage of conviction (2013, 50 words, 3 marks)

(ii) Integrity (2013, 50 words, 3 marks)

६) नागरी सेवांच्या संदर्भात खालील संज्ञांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.

(i) स्वत:च्या मतांवर ठाम राहण्याचे धर्य. (२०१३, ५० शब्द, ३ गुण)

(ii) सचोटी (२०१३, ५० शब्द, ३ गुण)

७) How do the virtues of trustworthiness and fortitude get manifested in public service? Explain with examples. (2015, 150 words, 10 marks) ७) नागरी सेवेमध्ये विश्वासार्हता आणि मनोधर्य या सद्गुणांचा आविष्कार कुठे होताना दिसतो? (२०१५, १५० शब्द, १० गुण)

वरील प्रश्नांव्यतिरिक्त विभाग ‘अ’ मध्ये इतरही अनेक प्रश्न सोडवत असताना वरील ३ नैतिक विचारसरणींचा वापर केला जाऊ शकतो. या विचारसरणींमधील मुख्य मूल्यांची माहिती, त्यातील बारकाव्यांचा अभ्यास, ते मांडणाऱ्या विचारवंतांच्या नैतिक धारणांची माहिती असणे व सरतेशेवटी या नैतिक विचारांचा प्रत्यक्ष आयुष्यातला वापर आणि महत्त्व यांची जाणीव या बाबींवर वरील प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे देणे अवलंबून आहे. या सगळ्या प्रश्नांची या सगळ्या अभ्यासाव्यतिरिक्त दिलेली उत्तरे ढोबळ आणि वरवरची वाटतात.

तसेच १५० शब्दांच्या मर्यादेत राहून अर्थपूर्ण आणि नेमके उत्तर देण्यासाठी विचारसरणीच्या या अभ्यासाची निश्चित मदत होते. पुढील लेखात आपण सामाजिक मानसशास्त्राविषयीचे काही घटक आणि त्यातील बारकावे पाहणार आहोत.

प्रस्तुत लेखकांनी नीतीशास्त्र, सचोटी आणि नसíगक क्षमता या पुस्तकाचे लेखन केले आहे.

First Published on January 4, 2018 1:35 am

Web Title: ethical thinking upsc exam