18 February 2019

News Flash

करिअर मंत्र

तुझ्या दहावीच्या सायन्स व गणित मार्काचा तसेच बारावीच्या फिजिक्स व गणिताच्या मार्काचा उल्लेख नाही.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. श्रीराम गीत

* माझी बारावी झाली आहे. बी.एस्सी.आय.टी.ला स्कोप आहे काय? त्यात करिअर करणे चांगले ठरू शकेल का? – मुकुल जोशी

तुझ्या दहावीच्या सायन्स व गणित मार्काचा तसेच बारावीच्या फिजिक्स व गणिताच्या मार्काचा उल्लेख नाही. तो असता तर माझ्या उत्तराला अर्थ राहिला असता. बारावी फिजिक्स व गणित यात तुला साठच्या पुढे मार्क असतील तरच आय.टी.चा विचार करावा. अन्यथा सामान्य मार्कानी, ए.टी.के.टी. घेत पास झालेल्या बी.एस्सी. आय.टी.ला स्कोप सोडाच, पण नोकरीही मिळणे कठीण राहील.

आपली ही अवस्था अतिकॉम्प्युटर प्रेमाने झाली आहे काय, याचे आत्मपरीक्षण सर्वात महत्त्वाचे ठरेल. हा उल्लेख हजारो विद्यार्थ्यांसाठी आहे एवढेच.

*    मी बेसबॉल खेळतो. माझी बारावी सायन्सची परीक्षा झाली आहे. प्रोफेशनल बेसबॉल खेळाडू म्हणून भारतात व यू.एस.मध्ये काय संधी आहेत? प्लीज मला मराठीत उत्तर द्यावे. – स्वप्निल चव्हाण

प्रोफेशनल बेसबॉल खेळाडू म्हणून भारतात खूप कमी संधी आहेत. कारण हा खेळ इथे आवडता व लोकांमध्ये रुजलेला नाही. ‘प्लीज मला मराठीत उत्तर द्यावे’ हे तू आवर्जून लिहिले आहेस आणि अमेरिकेत जाण्याचे, तिथे खेळण्याचे स्वप्न पाहात आहेस. या दोन्हीमधील विरोध लक्षात घे. खेळताना भारतातच पदवी घे. शक्य झाल्यास ती इंजिनीअरिंगची असावी. नंतर मास्टर्सला शिकायला जाता आले तर तिकडे खेळू शकशील. अमेरिकन बेसबॉल प्रोफेशनल खेळाडू व त्यांच्या क्षमता या सहसा ऑलिम्पिक दर्जाच्या अ‍ॅथलेटिक्समधील खेळाडूंच्या जवळपास जाणाऱ्या असतात. तिथपर्यंत पोचायला अजून तुझे वय व क्षमता वाढवायच्या आहेत.

*   मी बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्सच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला पुरातत्त्व शास्त्र शिकण्याची इच्छा आहे. त्यातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविकेचे शिक्षण घेता येईल काय? – भैरवी भोसले

पुरातत्त्वशास्त्र शिकण्याची इच्छा आहे म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधायला तुझ्याकडे अजून दोन वर्षे आहेत. मानव्य विद्या किंवा ह्य़ुमॅनिटीजमधून पुरातत्त्व शास्त्राचा पाया सुरू होतो. तो तुझ्याकडे नाही म्हणून हा प्रश्न तुला स्वत:लाच विचारावा लागेल. पुरातत्त्व शास्त्रातील विविध अभ्यासक्रम पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. प्रथम फॉरेन्सिक सायन्समध्ये डििस्टक्शन मिळवणे हे उद्दिष्ट ठेवावेस. पुरातन गोष्टींमधून नेमका अर्थ शोधणे यासाठीचा दृष्टिकोन अर्थातच फॉरेन्सिक सायन्समधूनही तयार होऊ शकतो. सध्या तुझ्यासाठी एवढेच पुरे आहे.

*    मी यंदा पी.सी.एम.मधून बारावी सायन्स पूर्ण केले. आयसरची परीक्षा मी दिलेली नाही. नॅनो सायन्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये मला शिकायचे आहे. कोणते कोर्स आहेत?

– प्रियदर्शिनी पवार

प्रथम बी.एस्सी. फिजिक्स, नंतर एम.एस्सी. तेही डििस्टक्शन मिळवून. त्यानंतर खऱ्या अर्थाने नॅनो टेक्नॉलॉजी सुरू होते. त्यातील प्रगती डॉक्टरेट करताना होत जाते. कोर्स कोणता, या भ्रमातून बाहेर यावेस. पदवी किंवा पदव्युत्तर पातळीवर त्याची तोंडओळख करून देणारी महाविद्यालये आहेत. तुला राजरस्ता सांगत आहे. मात्र हा राजरस्ता आजपासून बारा वर्षांच्या खडतर तपश्चर्येचा आहे. त्यामध्ये शॉर्टकट नाही, हे लक्षात घे.

* मी बारावी सायन्सला आहे. मला व्यावसायिक गेमर व्हायचे आहे. गेिमगमध्ये काम करण्यासाठी काय करावे?                  

– पांडुरंग लबडे

बारावी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री व गणित आहे. कॉम्प्युटर व गेमिंग नाही. बारावीमध्ये किमान सत्तर टक्के हे तुझे सध्याचे एकमेव ध्येय राहील. अ‍ॅनिमेशन व गेमिंग शिकवणाऱ्या खासगी संस्था अनेक आहेत. तसेच त्यातच पदवी देणाऱ्या संस्था गेल्या काही वर्षांत सुरू झाल्या आहेत. प्रत्येकाची प्रवेश परीक्षा असते. ती पास झाल्यास किमान दहा ते पन्नास लाख रुपयांची फी भरून गेिमगमधील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. अन्यथा इंजिनीअरिंग किंवा सायन्समधील पदवी घेऊन गेमिंगसाठीच्या तांत्रिक बाबीत म्हणजे टेस्टिंग, स्पेशल इफेक्ट्स इ. मध्ये शिरकाव करून घेणे शक्य असते. गेमिंग व कॉम्प्युटरचा ध्यास घेतलेली मोबाइलवर गेम्स खेळणारी मुले-मुली इयत्ता बारावी सायन्समध्ये ‘निक्काल’ घेऊन अनेकदा माझ्यासमोर येतात. म्हणून सुरुवातीचे ध्येय नीट लक्षात घ्यावे.

First Published on July 14, 2018 4:53 am

Web Title: expert advice for career