20 November 2019

News Flash

करिअरमंत्र

या संस्थांना मानवी हक्क विषयातील तज्ज्ञांची गरज भासत असते.

प्रतिनिधिक छायाचित्र

मी अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. पण नंतर मला जाणवले की मला एनजीओ क्षेत्रात आणि विशेषत: मानवी हक्क या विषयामध्ये मला रुची आहे. या क्षेत्रात काही संधी आहे का? या संदर्भातील कोणता अभ्यासक्रम मला करता येईल? कौस्तुभ वराट

मानवी हक्काविषयी संयुक्त राष्ट्र संघटना, अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक युरोपीयन देश बरेच जागृत असतात. मानवी हक्क आणि अधिकार या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बऱ्याच स्वयंसेवी संस्था (एनजीओ) देश परदेशात कार्यरत आहेत. या संस्थांना मानवी हक्क विषयातील तज्ज्ञांची गरज भासत असते. मात्र अशा संधींचा शोध तुम्हाला स्वत:ला घ्यावा लागेल. काही राष्ट्रीय महत्त्वाच्या नियतकालिके व वृत्तपत्रांमध्ये अशा जाहिराती प्रकाशित होत असतात. काही संस्था-

(१) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन राइट्स. अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्य़ुमन राइट्स- संपर्क-  http://www.rightsedu.net,

(२) नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी. अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्य़ुमन राइट्स लॉ

संपर्क-  http://ded.nls.ac.in/post-graduate-diploma-in-human-rights-law-pgdhrl/

(३) शासकीय विधि महाविद्यालय ,मुंबई. अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन ह्य़ुमन राइट्स-  संपर्क-  http://glcmumbai.com

यंदाच माझे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमधून पदवी शिक्षण पूर्ण झाले आहे. मला यूपीएससी करायची आहे. पार्टटाइम जॉब करता करता त्याचा अभ्यास येईल का? – ऋतुजा जगताप

संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा ही देशातीलच नव्हे तर जगातील कठीणतम परीक्षांपैकी एक समजली जाते. त्यामुळे या परीक्षेची तयारी तशीच करणे गरजेचे ठरते. तथापि या परीक्षेत दरवर्षी सहा ते सात लाख मुले बसतात आणि त्यातून अवघ्या अकराशे बाराशे उमेदवारांची निवड केली जाते. त्यामुळे अत्यंत स्पर्धात्मक अशा या स्थितीशी सामना करण्यासाठी आपल्याजवळ प्लॅन बी असणे कधीही चांगले. सध्या तुझ्याकडे तो आहे. त्यामुळे तू नोकरीनंतरच्या वेळेत झोकून देऊन अभ्यास केलास तर ही परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊ  शकतेस.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)

First Published on August 15, 2017 1:01 am

Web Title: expert answer one career related questions
टॅग Career
Just Now!
X