News Flash

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची वस्तुस्थिती

भारत ही जगातील १ अब्जापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहे

 

एखाद्या शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना स्ट्रीट चिल्ड्रन असे म्हटले जाते. त्यांना कुटुंबाचे संगोपन आणि संरक्षण कधीच मिळत नाही. ही मुले साधारणत: ५ ते १७ वयोगटातली असतात, आणि प्रत्येक शहरात त्यांची संख्या वेगवेगळी असते. अशी मुले पडक्या इमारती, पुठ्ठय़ाची खोकी, बागा किंवा रस्त्यावरच झोपतात.

  • भारत ही जगातील १ अब्जापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहे; ज्यांपैकी ४० कोटी मुलेमुलीच आहेत.
  • भारतीय लोकसंख्येपैकी एचआयव्ही/एड्स झालेल्यांचे प्रमाण फक्त ०.९% असले तरी या बाबतीत जागतिक पातळीवर आपला दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक दक्षिण आफ्रिकेचा आहे.
  • एड्सचे संकट फारच गंभीर असून एड्समुळे अनाथ झालेल्या मुलांसंबंधीच्या नोंदीही नाहीत.
  • तरीही, एड्समुळे अनाथ झालेल्या मुलांची सर्वाधिक संख्या भारतात असल्याचे अनुमानित आहे आणि येत्या पाच वर्षांत हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे.
  • एचआयव्ही/एड्सग्रस्त ४.२ दशलक्षांमध्ये १४ वर्षांंखालील मुलांचे प्रमाण १४% आहे.
  • आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासांत असे आढळले की एड्सग्रस्त व्यक्तींच्या मुलामुलींशी भेदभाव करण्यात येतो. ३५% ना मूलभूत सुविधा नाकारण्यात आल्या तर १७% ना जगण्यासाठी किरकोळ कामे करणे भाग पडले.
  • १९९१ च्या जनगणनेतील माहितीवरून दिसते की भारतात ११.२८ दशलक्ष श्रमिक मुले आहेत.
  • या बालश्रमिकांपैकी सुमारे ८५% ग्रामीण भागात आहेत आणि गेल्या दशकात हे प्रमाण वाढले आहे.
  • लक्षपूर्वक मांडलेले अंदाजदेखील सांगतात की आज भारतातील ३०,००० मुले देहविक्रय व्यवसायात गुंतलेली आहेत. भारतातील काही क्षेत्रांमध्ये देवदासी पद्धतीच्या नावांखाली बाल-वेश्यावृत्तीस सामाजिक मान्यता आहे. दरिद्री कुटुंबातील लहान मुली देवाला सोडल्या जातात व त्या धार्मिक वेश्या बनतात.
  • रस्त्यावर राहणाऱ्या मुलामुलींना रस्ता हेच आपले खरे घर वाटू लागते. जेथल्या परिस्थितीत त्यांना कोणतेही संरक्षण नसते, त्यांच्यावर कोणाची देखरेख नसते आणि त्यांना सल्ला देणारी कोणी जबाबदार प्रौढ व्यक्तीही नसते. मानवी हक्कासंबंधी संस्थेला असे दिसले आहे की भारतातील रस्त्यांवर सुमारे १८ दशलक्ष मुले राहतात किंवा कामे करतात. यांपैकी बरीचशी मुलेमुली गुन्हेगारी, वेश्याव्यवसाय, गँग बनवून मारामाऱ्या करणे आणि मादक द्रव्यांच्या वाहतुकीत गुंतलेली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 12:46 am

Web Title: fact situation of children living on the streets
Next Stories
1 करिअरमंत्र
2 एमपीएससी मंत्र : सामान्य  अध्ययन- पेपर -२
3 नोकरीची संधी
Just Now!
X