प्रा. सुचित्रा राजगुरू

फॅशन उद्योगामध्ये पेहरावाइतकेच महत्त्व तो खुलवण्याला आहे. त्याचेही एक वेगळे शास्त्र आहे. त्यात करिअरच्या कोणत्या संधी आहेत, याविषयी..

Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

ड्रेपिंग: आपल्याकडे फक्त सलग कपडा आहे. ज्यावर अजून काम करणे बाकी आहे. असा कपडा डमीवर अशा पद्धतीने गुंडाळायचा की त्यानंतर तो तसाच्या तसा शिवता येईल. यात त्या पेहरावाचे कट्स, निऱ्या हे बारकावेही दिसायला हवेत. हे काम ड्रेपिंग आर्टस्टि करतो.

स्टायलिंग: स्टायलिंगमध्ये सर्व गोष्टी बाहेरून आणल्या जातात. हे पूर्णपणे वेगळे क्षेत्र आहे. एखादा पेहराव आणखी खुलवण्याचे काम स्टायलिस्ट करतात. रॅम्पवॉक करताना मॉडेलच्या अंगावर कपडय़ाव्यतिरिक्त आणखी अनेक गोष्टी असतात. उदा. पर्स, दागिने, चपला, पिसे, टोपी. या सगळ्या वस्तू नेमक्या कशा प्रकारे मांडाव्यात हे स्टायलिस्ट ठरवतात. फक्त रॅम्पवरच्याच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींच्याही स्वत:च्या स्टायलिस्ट असतात. वेगवेगळ्या ठिकाणी किंवा कार्यक्रमांना जाताना त्या सेलिब्रिटींनी कशा प्रकारे तयार व्हावे, कोणत्या कपडय़ांवर कोणते दागिने, चपला, पर्स घ्याव्यात. कोणते पेहराव निवडावे, त्यांची रंगसंगती कशी असावी, अशा अनेक गोष्टी स्टायलिस्ट ठरवत असतात.

ॅक्सेसरी डिझायनिंग: यामध्ये दागिने कसे बनवायचे हे शिकवले जाते. यात फार खोलात जाऊन शिकवता येत नसले तरी अंगठी, नेकलेस, पायातील एखादा सर असे दागिने बनवायला शिकवले जातात. ज्याची सध्या चलती आहे ते शिकवण्याकडे अधिक भर दिला जातो.

होम फर्निशिंग: हाही एक फॅशन डिझायनिंगचाच प्रकार आहे. हे सगळे प्रकार तुम्हाला महाविद्यालयातल्या अभ्यासक्रमात शिकवले जातात. आíकटेक्टने एकदा तुमचे घर बनवले की ते सजवण्याची जबाबदारी होम फर्निशिंगकडे येते. संपूर्ण घर कसे सुंदर दिसेल हे होम फर्निशिंग एक्स्पर्टच जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात. कोणते पडदे लावले पाहिजेत, बेड कव्हर, सोफा यांची निवड कशी करावी याचे ज्ञान त्यांना चांगल्या प्रकारे असते. सध्या या प्रकाराला फार अधिक मागणी आहे. पडदे, बेडशीट, कुशन कव्हर डिझाइन करण्याचे काम यांच्याकडे असते.

शू डिझायनिंग: फॅब्रिक स्टडी नावाचा विषय असतो. यात लेदर इण्डस्ट्री हाही एक प्रकार आहे. यात लेदरचे बूट, बेल्ट, पाकीट, टोप्या, पर्स, पिशव्या आदी अगणित प्रकार असतात. त्याचे वेगळे डिझायनिंगही केले जाते. परंतु याचे शिक्षण देणाऱ्या फार कमी संस्था भारतात आहेत.

याशिवायही फॅशन डिझायनिंगमध्ये अनेक प्रकार आहेत ज्यात चांगले करिअर करता येऊ  शकते. पण या गोष्टींसाठी तुम्ही पहिल्यांदा त्याचे शिक्षण घेऊन या क्षेत्रात उतरायला हवे. वेळ जात नाही किंवा दुसरीकडे कुठेही प्रवेश मिळाला नाही किंवा वर्ष वाया जाऊ  नये यासाठी जर फॅशन डिझायनिंग करायचे असेल तर अजिबात करू नका. यामध्ये तुम्ही फक्त तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत वाया घालवता.

या क्षेत्राबद्दलचे आणखी एक अज्ञान म्हणजे यात बहुतांश मुली असतात. तर असे अजिबात नाही. आता या क्षेत्रात मुलगेही मोठय़ा प्रमाणावर येत आहेत. काही वेळा तर ते मुलींपेक्षा अधिक मन लावून काम करतानाही दिसतात. आजही नव्वद टक्के टेलर हे पुरुषच असतात. त्यामुळे अमुक एकच व्यक्ती हा कोर्स करू शकते हे आता इतिहासजमा झाले आहे. अनेक विद्यार्थी हे स्वत:चे ब्युटिक काढतात. तुमच्याकडे कलागुण आणि व्यावसायिकतेचा उत्तम संगम असेल तर बुटिक  चालू शकते.

फॅशनमध्ये करिअर करताना एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला हवी की हे काळाप्रमाणे चालणारे माध्यम आहे. इथले ट्रेंड सतत बदलतात. आपण काळाच्या मागे पडलो तर यातून बाद झालो. त्यामुळे सतत स्वत:चे ज्ञान अद्ययावत करायला हवे. कामाशी तडजोड करू नका. मग पैसा आणि प्रसिद्धी मिळतेच. नवीन शिकण्याची इच्छा, आवड, रंगांची जाण, कपडय़ांच्या प्रकाराबद्दल माहिती आदी गोष्टी असतील तर हे क्षेत्र तुमचेच आहे.