News Flash

वेगळय़ा वाटा : चित्रकला व छायाचित्रणाचा सुरेख संगम

नावाजलेल्या चित्रकारांची चित्रे भिंतींवर लावून ते घराला एक वेगळाच टच देतात.

 

फाइन आर्ट फोटोग्राफी

कोणाला आपलं घर अप्रतिमरीत्या सजवलेलं आवडणार नाही? आपलंही घर मोठं असावं, सुंदर सजवलेलं असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. मग ते मध्यमवर्गीय कुटुंब असू दे किंवा उच्चभ्रू. घर सुंदर दिसावं यासाठी प्रत्येक जणच आग्रही असतो. प्रत्येकालाच आपल्या घराच्या भिंती या अधिक डेकोरेटिव्ह असाव्यात असं वाटतं. त्यामुळे बाजारात असलेले नवनवीन वॉल पोस्टर्सची सध्या विशेष चलती आहे. भिंतीवर कारंजे, फुलं असे डेकोरेटिव्ह वॉल पोस्टर्स लावायला अनेकांना आवडतं. जे लोक कला, साहित्य अशा गोष्टींच्या अधिक जवळ असतात ते रंगांमध्ये अधिक गुंतवणूक करताना दिसतात. म्हणजे नावाजलेल्या चित्रकारांची चित्रे भिंतींवर लावून ते घराला एक वेगळाच टच देतात.

फाइन आर्ट्सच्या गोष्टींच्या किमतीही अधिक असतात. त्यामुळे त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यांना हुसेन, राझा, अतुल दोढीया, परेश मैत्री यांसारख्या कलाकारांची चित्रे विकत घेणे अशक्यच असते. त्यामुळेच नावाजलेल्या चित्रकारांची चित्रे विकत घेण्यापेक्षा जास्त प्रसिद्ध नसलेल्या चित्रकारांची चित्रे विकत घेतात. याचाच परिणाम म्हणजे राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय बाजारात परवडणाऱ्या किमतीतील चित्रे उपलब्ध आहेत.

सध्याच्या काळात इन्स्टॉलेशन आणि फोटो सन्स्टॉलेशन हे फाइन आर्ट्सचे विषय आहेत. पेन्टिंगसारखेच लोकं आता आर्टिस्टिक फोटो भिंतीवर सजावटीचा एक भाग म्हणून लावण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. यांच्या किमतीही कमी असल्यामुळे लोकं या आर्टिस्टिक फोटोंना अधिक पसंती देत आहेत. हे फोटो जरी असले तरी ते पेन्टिंगसारखे वाटतात. हा अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेन्टिंगचा एक प्रकार आहे असा अनेकांचा समज होतो. या प्रकाराला प्रिन्ट्स ऑफ फाइन आर्ट्स असेही म्हणतात.

सध्या कोणत्याही फोटोला डिजिटल टच देणे हे महत्त्वाचेच झाले आहे. कोणत्याही फोटोला डिजिटल टच देणे म्हणजे त्या फोटोमध्ये काही हलके रंगांचे व लाइट्समधले बदल करणे. पण डिजिटल पेन्टिंग हे पूर्णपणे वेगळे असते. डिजिटल पेन्टिंगचे सॉफ्टवेअर हे वेगळे असते. याला डिजिटल मिक्स मीडिया असेही म्हणतात.

असे पेन्टिंग विकत घेताना लोकं वेगवेगळ्या अ‍ॅन्गलने काढलेल्या फोटोंना प्राधान्य देतात. अनेकदा कामाच्या ठिकाणी किंवा आर्टेक्टच्या ऑफिसमध्ये असे फोटो फार छान दिसतात. एखाद्याला आपल्या कामाच्या क्षेत्राशी निगडित वॉलपेपरने आपले डेस्क किंवा ऑफिस सजवू शकतात. फक्त ऑफिसचा रंग आणि जागा याप्रमाणे त्याने या प्रिन्ट्स निवडणे आवश्यक आहे.

सध्या इमेज इण्डस्ट्रीबरोबरच कोणती दुसरी इण्डस्ट्री झपाटय़ाने वाढत असेल तर ती प्रिन्टिंग इण्डस्ट्री आहे. त्यामुळेच फाइन आर्ट फोटोग्राफीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करिअर होऊ  शकते. याचे प्रिन्ट्स हे अनेकदा अर्कायवह पेपरवर घेतले जातात. पण फक्त हाच एक पर्याय आहे असे नाही. कॅनव्हास ट्रेर शीट्स, कपडा, सेरेमिक सरफेस, मेटल प्लेट्स यांसारख्या अनेक प्रकारांमध्ये या फोटोंचे प्रिन्ट्स काढले जातात. खरे तर इण्टरनेटमुळे जग फारच जवळ आले आहे. इण्टरनेटच्या साहाय्याने तुम्हाला अनेक नवनवीन कल्पनाही दिसू शकतात. पण तुम्हाला जर फोटोग्राफीमध्ये करिअर करायचे असेल तर टेबलटॉप फोटोग्राफी किंवा इण्डस्ट्रियल फोटोग्राफीसोबत फाइन आर्ट्स फोटोग्राफीचा विचार करायला काहीच हरकत नाही. यात जर योग्य दिशा मिळाली तर कमी वेळात भरपूर पैसाही मिळू शकेल.

संस्था-

उडान www.udaan.org.in/

dilipyande@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:27 am

Web Title: fine art photography
Next Stories
1 सौर घरगुती दीप योजना
2 नोकरीची संधी
3 वेगळय़ा वाटा : देखण्या आठवणी
Just Now!
X