News Flash

अन्न विषयक कायदा

अन्नभेसळ हा विषय इतिहास काळापासून मानवी जीवनाला भेडसावणारा विषय आहे.

अन्नभेसळ हा विषय इतिहास काळापासून मानवी जीवनाला भेडसावणारा विषय आहे. या बाबींवर मात करण्याासाठी केंद्र शासनाने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ व नियम १९५५ अस्तित्वात आणला. सुरुवातीस हा कायदा शहरी भागासाठी मुख्यत: महानगरपालिका व नगरपालिका यांच्यापुरता मर्यादित होता. नंतर ग्रामीण भागालासुद्धा अन्नभेसळीपासून सुरक्षा मिळावी यासाठी सन १९७० मध्ये कायद्याची व्याप्ती वाढविण्याात आली. नुकतेच सन २००६ मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करून अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ हा कायदा अस्तित्वात आला.

उद्देश

  • सर्वाना सुरक्षित अन्न उपलब्ध व्हावे.
  • ग्राहकाचे हक्क अबाधित राहावेत.
  • सकस व परिपूर्ण पोषक आहाराचा पुरवठा राज्यातील सर्व लाभार्थीना मिळावा.
  • तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.

अंमलबजावणी

  • पाणी आणि अन्न यांची गुणवत्ता व नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीने सामान्य जनतेचे आरोग्य अबाधित ठेवणे.
  • सामान्य जनतेमध्ये स्वच्छ व शुद्ध पाण्याबाबत जागरूकता निर्माण करणे.
  • या सर्व तीन विभागांतील कामाव्यतिरिक्त पुढील कार्यात सहभाग.
  • विविध तपासण्यांव्यतिरिक्त, अन्न व शेती संघटना, भारतीय वैद्यकीय संघटना, जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून अर्थसहायित प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:33 am

Web Title: food security act
Next Stories
1 खिलाडू वृत्ती जोपासणारे करिअर
2 यूपीएससीची तयारी : परीक्षा हॉलमध्ये
3 मेरी आवाजही पहचान है!
Just Now!
X