केंद्रीय लोकसेवा आयोग (४स्र्२ू)सूचक जाहिरात क्र. १९/२०१६

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) मध्ये (१) पब्लिक प्रॉसिक्युटर (४७ जागा अजा – ८, अज – ४, इमाव – १०, जन. -२५) आणि (२) असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर (१५ जागा. अजा – १, इमाव – ५, जन. – ९) पदांची भरती.

पात्रता –

(१) पब्लिक प्रॉसिक्युटर –  कायदा विषयातील पदवी आणि ७ वर्षांचा क्रिमिनल केसेस चालविण्याचा अनुभव.

(२) असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर – कायदा विषयातील पदवी. (अनुभवाची अट नाही.)

वयोमर्यादा – दोन्ही पदांसाठी ३५ वर्षांपर्यंत (अजा/अज – ४० वष्रे, इमाव – ३८ वष्रे). ऑनलाइन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन ँ३३स्र्://४स्र्२ूल्ल’्रल्ली.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर दि.१० नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावे.

 

कोकण रेल्वेमध्ये ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या

एकूण ११ पदांची कंत्राटी तत्त्वावर भरती.

पात्रता – सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी/पदविका

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१७ रोजी ३० वष्रे (अजा/अज – ३५ वष्रे, इमाव – ३३ वष्रे)

वेतन रु. ३०,०००/-

भरतीची तारीख, वेळ आणि वॉक-इन-इन्टरव्ह्य़ूसाठी – दि. ३ नोव्हेंबर २०१६, सकाळी १० वाजता ‘एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सेक्टर-ए, सीवुड्स (पश्चिम), नवी मुंबई – ४००७०६ या ठिकाणी उपस्थित राहावे. रजिस्ट्रेशनसाठी वेळ ९.३० ते १.३० पर्यंत.

परीक्षा शुल्क नाही.

एअर इंडिया लिमिटेडमध्ये एकूण ३०० पदांची भरती

 

एअर इंडियाच्या दक्षिण विभागामध्ये प्रशिक्षणार्थी केबिन क्रू  निवडण्यासाठी

पुरुष एकूण ७५ पदे (अजा – १४, अज – ५, इमाव – २०, खुला – ३६)

महिला एकूण २२५ पदे (अजा – ३९, अज – १६, इमाव – ६३, खुला – १०७)

पात्रता – बारावी उत्तीर्ण. ३ वर्षांचा हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटिरग टेक्नोलॉजीचे पदवी/पदविकाधारक यांना प्राधान्य. इंग्रजी, िहदी भाषेवरील प्रभुत्व आवश्यक.

वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी १८ ते २७ वष्रे (अजा/अज – १८-३२ वष्रे,

इमाव – १८- ३० वष्रे) फक्त अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात.

शारीरिक मापदंड – उंची – महिला – १६० सें.मी., पुरुष – १७२ सें.मी.

निवड पद्धती – ग्रूप डायनामिक्स आणि मुलाखत (जीडी कम पीएटी)

परीक्षा शुल्क – रु. १,०००/- (अजा/अज यांना फी माफ)

ट्रेिनगदरम्यान स्टायपेंड दरमहा रु. १५,०००/-  वेतन दरमहा रु. ३५,७०५/-

ऑनलाइन अर्ज www.airindia.in http://www.airindia.in या संकेतस्थळावर दि. ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावा.