विद्यार्थी मित्रांनो गेल्या लेखात आपण प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची माहिती घेतली आहे. आज आपण आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेऊयात. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना आपण साधारणपणे त्याचे १८१८ ते १९४७ आणि १९४७ पासून पुढे अर्थात स्वातंत्र्यपूर्व भारत व स्वातंत्र्योत्तर  भारत अशा दोन विभागांत विभाजन करू शकतो. या विभागावर आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची संख्या साधारणपणे ९ ते १७ प्रश्नांच्या दरम्यान असल्यामुळे या विभागावर साहजिकच अधिक लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

महत्त्वाचे घटक व अभ्यासस्रोत

loksatta analysis cm eknath shinde campaign towards hindutva issue for lok sabha election
विश्लेषण : विकासाला हिंदुत्वाची जोड… ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘मोदी’ पॅटर्न?
himachal pradesh
हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय नाट्य; क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेस अडचणीत, भाजपाकडून बहुमत चाचणीची मागणी
PM Narendra Modi
“२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, कारण..”; केंद्रातल्या बड्या मंत्र्याचं भाकित
devendra fadnavis veer savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ पदवी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस करणार केंद्राला विनंती!

१.  आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास या विभागावर काही प्रमुख मुद्दय़ांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना, महत्त्वाच्या भारतीय सत्तांविरोधात झालेली ब्रिटिशांची युद्धे, १८५७चा उठाव त्यातील नेतृत्व, त्याची कारणे आणि परिणाम, भारतात प्रबोधनाची सुरुवात करणाऱ्या एकोणीसाव्या शतकातील व्यक्ती (उदा. केशवचंद्र सेन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, न्यायमूर्ती रानडे) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि स्थापनेमधील मोलाचे योगदान असणाऱ्या व्यक्ती, काँग्रेसला विरोध करणाऱ्या व्यक्ती, विरोधाची कारणे, ब्रिटिशांची भूमिका, काँग्रेसच्या स्थापनेनंतर उदयास आलेले जहाल आणि मवाळ गट, त्यांची कार्यपद्धती, काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने आणि त्यातील महत्त्वाचे निर्णय, मुस्लीम लीगची स्थापना, एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील काँग्रेसेतर महत्त्वाच्या संघटना, ब्रिटिशांनी अस्तित्वात आणलेले महत्त्वाचे कायदे, त्यातील तरतुदी, ब्रिटिशांची फोडा व झोडा नीती, त्यावर भारतीयांची प्रतिक्रिया, काँग्रेसमधील फूट आणि पुन्हा एकीकरण, स्वदेशी चळवळ, क्रांतिकारी चळवळ, त्यामध्ये अश्फाक उल्ला खान, मदनलाल िधग्रा, जतीन दास, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सूर्यसेन तसेच कल्पना दत्ता, वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, राणी गीडालू अशा क्रांतिकारी स्त्रियांचे योगदान, महात्मा गांधींचे भारतातील आगमन, त्यांचे सत्याग्रहाचे धोरण, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चले जाव चळवळ, या चळवळींचे परिणाम, आंबेडकर आणि त्यांची दलितांच्या हक्कासाठीची चळवळ, १९४२ ते १९४७ या कालावधीतील घडामोडी, सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे कार्य, स्वातंत्र्यप्राप्तीचे १९४७ सालातील महत्त्वाचे टप्पे, ब्रिटिश प्रशासन व्यवस्था व प्रशासनामध्ये योगदान दिलेले महत्त्वाचे गव्हर्नर जनरल, त्यांचे महत्त्वाचे निर्णय तसेच या कालखंडातील महाराष्ट्रातील घटना, महत्त्वाच्या व्यक्ती; त्यांची काय्रे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाजसुधारक आणि त्यांचे कार्य या मुद्दय़ांवर प्रश्न विचारले गेले आहेत. तर या विश्लेषणावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आधुनिक कालखंडाचा अभ्यास करताना स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यात महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, त्यांची काय्रे व ब्रिटिशांचे धोरण आणि त्यास भारतीयांची प्रतिक्रिया या मुद्दय़ांवर प्रश्नांचा भर अधिक असतो. या विभागाचा अभ्यास करण्यासाठी स्टेट बोर्डाची आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती असणारी पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचे पुस्तक तसेच, बिपिन चंद्र यांचे ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स’ हे पुस्तक अभ्यासोपयोगी आहे.

२. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास –

या विभागामध्ये घटनानिर्मिती प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका, संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका, संयुक्त महाराष्ट्र चळवळ; त्यातील महत्त्वाचे नेते, परिषदा, पंडित नेहरू आणि त्यांचे अलिप्ततावादी धोरण, इंदिरा गांधी आणि त्यांचे परराष्ट्र धोरण, १९९१च्या आíथक धोरणाचा भारताच्या समाजावर पडलेला प्रभाव यासाठी बिपीन चंद्र यांचे ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ हे पुस्तक महत्त्वाचा स्रोत ठरते.

त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना २०१७-१८ सालात ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंच्याहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणाने चच्रेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास केल्यास निश्चितच इतिहास या घटकामध्ये आपल्याला जास्तीतजास्त गुण मिळविणे शक्य होईल. या अनुषंगाने चंपारण सत्याग्रह (१९१७), इंदिरा गांधी (जन्मशताब्दी वर्ष १९१७), चले जाव चळवळ (७५ वष्रे पूर्ण), दादाभाई नौरोजी (१००वी जयंती) हे आणि असे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणे नक्कीच उपयोगी ठरेल. पुढील लेखामध्ये आपण भूगोलाचा अभ्यास नक्की कोणत्या पद्धतीने करावा याची चर्चा करूयात.