15 December 2017

News Flash

आय.सी.टी योजना

मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि शासकीय माध्य.

लोकसत्ता टीम | Updated: August 5, 2017 12:59 AM

आय.सी.टी (इनफोर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इन स्कुल्स) केंद्र पुरस्कृत योजना असून ही योजना राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रथम शिक्षकांना आणि त्यानंतर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

उद्दिष्टे

  • मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि शासकीय माध्य. शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करून देणे, हे आयसीटीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • माध्यमिक शाळांना आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करून सगंणक साक्षरता वाढविणे.
  • त्या साहाय्याने अस्तित्वात असलेल्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता विकसित करणे.
  • माहितीच्या आणि डिजिटल युगाची विद्यार्थ्यांना ओळख होण्याच्या उद्देशाने ही योजना माध्यमिक स्तरावर राज्यात सन २००७-२००८ पासून राबविण्यात येत आहे.

अनुदान

  • केंद्र शासनाकडून ७५ टक्के अनुदान प्राप्त होते.
  • हे अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-१ येथे अर्ज करावा.
  • माहिती मिळवण्यासाठी अर्ज सबंधित जिल्ह्य़ाच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यामार्फत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय म. रा. पुणे-१ यांना सादर करावा.

अधिक माहितीसाठी : http://mhrd.gov.in/ict_overview

First Published on August 5, 2017 12:59 am

Web Title: ict scheme information and communication technology