नोव्हेंबर २००८ मध्ये आदर्श शाळा योजना अमलात आली. प्रति गट – एक शाळा या प्रमाणात बुद्धिमान ग्रामीण बालकांना दर्जेदार शिक्षण देता यावे यासाठी उत्कृष्टतेचा मापदंड असणाऱ्या आदर्श शाळा उभारणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेची वैशिष्टय़े –

  • प्रत्येक गटामध्ये दर्जेदार उच्च माध्यमिक शाळा उपलब्ध करणे.
  • किमान एक उद्दिष्ट निश्चित करणे.
  • नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि शिक्षणक्रमाचा वापर करणे.
  • पायाभूत सुविधा, अभ्यासक्रमाचा, मूल्यमापन आणि शालेय प्रशासनासंदर्भात आदर्श भूमिका

योजनेच्या अंमलबजावणीचे  दोन प्रकार –

  • शैक्षणिकदृष्टय़ा मागास भागांमध्ये राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांमार्फत
  • शैक्षणिकदृष्टय़ा मागास नसलेल्या भागांमध्ये सार्वजनिक- खासगी भागीदारीमार्फत.