23 November 2017

News Flash

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेडचा एमबीए अभ्यासक्रम

अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.

द. वा. आंबुलकर | Updated: September 5, 2017 1:04 AM

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणाऱ्या एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस) या पदव्युत्तर पदवी अभ्यसक्रमाच्या २०१८-२० या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ५०% (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ४५%) असायला हवी.

विशेष सूचना- जे अर्जदार यंदा त्यांच्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. लेखी निवड परीक्षा देशांतर्गत २० निवड केंद्रांवर २६ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात येईल.

लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेडच्या नवी दिल्ली, कोलकाता वा काकिनाडा केंद्रांवरील एमबीए (इंटरनॅशनल बिजनेस) अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड, बी- २१, कुतुब इन्स्टिटय़ूशनल एरिया, नवी दिल्ली ११००१६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०१७ आहे.

ज्या पदवीधरांना विदेश व्यापार क्षेत्रात विशेष पात्रतेसह पुढील करिअर करायचे असेल अशांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.

  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड, नवी दिल्लीच्या दूरध्वनी ०११- ३९१४७२१३ अथवा ३९१४७२०० वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या iift.edu या संकेतस्थळाला भेट द्यावी.

First Published on September 5, 2017 1:04 am

Web Title: iift indian institute of foreign trade mba studies