भारतीय नौसेना सेलर्समॅट्रिक भरती.

(संगीतज्ञ) (म्युझिशियन) बॅच -०२/२०१८

पात्रता – दहावी उत्तीर्ण. (फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र आहेत.)

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. १ ऑक्टोबर १९९३ व ३० सप्टेंबर २००१दरम्यानचा असावा.

संगीतातील योग्यता –

(१) ताल, लय आणि एक पूर्ण गीत गायनामध्ये नपुण्य.

(२) भारतीय किंवा विदेशी मूळ असलेल्या साधनांवर व्यावहारिक कौशल्य आवश्यक. जसे की, वायू उपकरण, की-बोर्ड, गिटार, तबला, मृदंग, पखवाज, ढोलक, इ.

(३) संगीत अनुभव प्रमाणपत्र – संगीत संस्थेकडील किंवा आंतरराष्ट्रीय बोर्डातून किमान ग्रेडचे प्रमाणपत्र आवश्यक.

स्टायपेंड – प्रशिक्षणादरम्यान रु. १४,६००/- प्रतिमाह.

वेतन – डिफेन्स वेतन मॅट्रिक्स लेव्हल-३.

नौसनिकांना पुस्तके, वाचन सामग्री, गणवेश, जेवण आणि निवास, इ. नि:शुल्क देण्यात येईल.

निवडीची पद्धत –

(१) प्रारंभिक स्क्रीनिंग तपासणी (९ जुल ते १३ जुल २०१८ पर्यंत होण्याची शक्यता.) वयाची पडताळणी, शैक्षणिक योग्यता, संगीत प्रमाणपत्र आणि संगीताच्या प्रतिभेचे आकलन.

(२) शारीरिक स्वस्थता तपासणी (पीएफटी) – ७ मिनिटांमध्ये १.६ कि.मी. अंतर धावणे, २० उठाबशा आणि १० पुशअप्स.

(३) प्रारंभिक वैद्यकिय तपासणी – उंची – किमान १५७ सें.मी., छाती – किमान ७ सें.मी. फुगविता यावी.

(४) अंतिम स्क्रीिनग तपासणी – (२० ते २४ ऑगस्ट २०१८ दरम्यान) भा.नौ.पो. कुंजाली, कुलाबा, मुंबई येथे होण्याची शक्यता.

अंतिम स्क्रीिनग तपासणीनंतर उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना आयएनएस चिल्का (उडिसा) करिता भरती कॉलअप लेटर शक्यतो सप्टेंबर २०१८ मध्यापर्यंत देण्यात येईल.

प्रशिक्षण ऑक्टोबर २०१८ पासून सुरू होईल.

१५ आठवडय़ांचे बेसिक प्रशिक्षण आयएनएस चिल्का येथे नंतर २६ आठवडय़ांचे विशेषज्ञता प्रशिक्षण मुंबई येथे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. २७ मे २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com