भारत सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व इंडो-यूएस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय महिला संशोधकांना देण्यात येणाऱ्या इंडो-यूएस फेलोशिप फॉर वुमेन इन स्टीम म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी इंजिनीअिरग, मॅथमॅटिक्स अ‍ॅण्ड मेडिसीन या विशेष फेलोशिपसाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक महिला संशोधकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

वुमेन ओव्हरसीज स्टुडंट इंटर्नशिप-

अर्जदार महिलांनी विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी, वैद्यकीय शास्त्र या विषयावरील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी व त्या सध्या संबंधित विषयात संशोधनपर पीएच.डी. करीत असाव्यात व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.

वयोगट- अर्जदार महिलांचे वय २८-२-२०१८ रोजी २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.

वुमेन ओव्हरसीज फेलोशिप-

अर्जदार महिलांनी बेसिक सायन्स, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी, वैद्यकशास्त्र यांसारख्या विषयात संशोधनपर पीएच.डी. केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

वयोगट- अर्जदार महिलांचे वय २८-२-२०१८ रोजी २७ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.

योजनेअंतर्गत समाविष्ट विषय- योजनेअंतर्गत समाविष्ट विषयांमध्ये कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, अर्थ सायन्स, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी तंत्रज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, वैद्यक विज्ञान यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला  आहे.

कालावधी- संशोधनपर फेलोशिपचा कालावधी तीन ते सहा महिन्यांपर्यंत असेल.

अधिक माहिती व तपशील- फेलोशिप योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशीलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडो- यूएस फेलोशिप फॉर वुमेन- स्टीमची जाहिरात पाहावी अथवा http://www.iusstf.org किंवा wistemm@indousstf.org या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख –  संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१८ आहे.

फेलोशिपचे स्वरूप व तपशील-

‘स्टीम’ संशोधनपर फेलोशिपचा मुख्य उद्देश भारतातील महिला संशोधकांना त्यांच्याशी संबंधित विषयात अमेरिकेतील प्रमुख शिक्षण संस्था वा संशोधन संस्थेत विशेष काम करण्यास प्रोत्साहन व चालना देणे हा आहे. योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिला संशोधकांना त्यांच्या संशोधन कालावधीत मासिक पाठय़वेतन, प्रवास भाडे, प्रवास विमा, आकस्मिक खर्च राशी, शैक्षणिक संमेलन शुल्क यांसारखे फायदे देय असतील.