News Flash

उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मैत्री कक्ष’

ऑनलाइन आणि योग्य कालावधीत मंजुऱ्या मिळवून देणे.

 

राज्यातील औद्य्ोगिक गुंतवणुकीस चालना देण्यासाठी उद्योगांना लागणाऱ्या विविध विभागांच्या परवान्यांच्या मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत आहे. त्यामुळेच उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी एकखिडकी योजना राबवण्यासाठी ‘मैत्री कक्ष’ सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

मैत्री कक्षाची जबाबदारी

  • गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी संपर्क साधून सर्व मंजुऱ्या मिळवून देणे
  • ऑनलाइन आणि योग्य कालावधीत मंजुऱ्या मिळवून देणे.

मैत्री कक्षेतील विभाग

  • पर्यावरण, कामगार, औद्य्ोगिक सुरक्षा, आरोग्य संचालनालय, कामगार विभाग बाष्पके, नगरविकास, वन विभाग, ऊर्जा, महसूल, जलसंपदा, उद्योग विभाग, अन्न नागरी पुरवठा, विधी न्याय, सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास महामंडळ या सर्व विभागांचे अधिकारी मैत्री कक्षचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार. महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी त्यांची आढावा बैठकही होईल.

गुंतवणूकदारांना मदत

  • उद्योग विकासाच्या दृष्टीने मैत्री कक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘एकखिडकी योजने’तून केवळ परवाने मिळवून देणे एवढेच काम अपेक्षित नाही. गुंतवणूकदाराला ज्या काही अडचणी येतील, त्या सोडवण्याचे अधिकारही सोपवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:25 am

Web Title: industrial investment
Next Stories
1 नोकरीची संधी
2 महाराष्ट्रातील १० वी १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी
3 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : किंग्स्टन विद्यापीठात व्यवस्थापनाचे धडे