24 March 2019

News Flash

विद्यापीठ विश्व : महत्त्वाचे अभ्यासकेंद्र

हे विद्यापीठ नॉर्थ कॅम्पस आणि साउथ कॅम्पस अशा दोन संकुलांमध्ये विभागले गेलेले आहे

दिल्ली विद्यापीठ

दिल्ली विद्यापीठ

संस्थेची ओळख

देशाच्या राजधानीमध्येच वसलेले आणि राजधानीच्याच नावाने ओळखले जाणारे दिल्ली विद्यापीठ हे केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा असूनही मोठय़ा संख्येने कॉलेजांना संलग्नता देणारे विद्यापीठ म्हणूनही विचारात घेतले जाते. १९२२ मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ केंद्रीय दर्जासोबतच आपल्या अभ्यासक्रमांच्या वेगळेपणामुळेही विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संस्था ठरते. इतर सर्वच केंद्रीय विद्यापीठांप्रमाणे भारताचे राष्ट्रपती या विद्यापीठाचे व्हिजिटर म्हणून पद भूषवितात. देशाचे उपराष्ट्रपती या विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती ठरतात, तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना या विद्यापीठाचे पदसिद्ध उपकुलपती म्हणून मान्यता मिळते. दिल्लीमध्ये आपल्या उत्तर आणि दक्षिण संकुलाच्या माध्यमातून चालणारा या विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातील विद्यार्थ्यांसाठीही कायमच दिशादर्शकाची भूमिका बजावताना दिसतो. बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक व नैतिक मूल्यांचा विकास आणि सामाजिक विकास या मुद्दय़ांचा आढावा घेणारे अभ्यासक्रम हे या विद्यापीठाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरत आहेत.

संकुले आणि सुविधा

हे विद्यापीठ नॉर्थ कॅम्पस आणि साउथ कॅम्पस अशा दोन संकुलांमध्ये विभागले गेलेले आहे. सुरुवातीच्या काळापासून विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये चालणारा शैक्षणिक विस्तार, दिल्ली शहराच्या वाढत्या गरजा आणि विस्ताराच्या बरोबरीनेच दक्षिणेकडेही झाला. त्याच अनुषंगाने विद्यापीठाने १९७३ मध्ये साउथ कॅम्पसची सुरुवात केली. एकूण ६९ एकरांच्या या नव्या शैक्षणिक परिसरामध्ये सध्या विद्यापीठ कला, आंतरविद्याशाखीय अभ्यास, अप्लाइड सायन्सेस या विद्याशाखांशी संबंधित एकूण १९ विभाग आणि त्यामधील अभ्यासक्रम चालविते. एस. पी. जैन सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडिजही याच संकुलामध्ये वसलेले आहे. कॅम्पस ऑफ ओपन लìनगच्या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाधारित अध्ययन- अध्यापन पद्धतींच्या वापराद्वारे व्यवसायाभिमुखतेला चालना देणारे अभ्याससाहित्य आणि अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत. त्यासाठी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत संस्थांचीही मदत घेण्यात आली आहे. बाहेरगावाहून विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या दोन्ही संकुलांमध्ये वसतीगृहांची सुविधा उपलब्ध आहे. नॉर्थ कॅम्पसमध्ये एकूण १५ वसतिगृहे, तर साउथ कॅम्पसमध्ये तीन वसतीगृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या दिल्ली युनिव्हर्सिटी लायब्ररी सिस्टिममध्ये विद्यापीठाच्या सेंट्रल लायब्ररीसह विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एकूण नऊ ग्रंथालयांचा समावेश होतो. या सर्व ग्रंथालयांमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात.

विभाग आणि अभ्यासक्रम

आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड बिझनेस स्टडिज, एज्युकेशन, लॉ, मॅनेजमेंट स्टडिज, मॅथेमेटिकल सायन्सेस, मेडिकल सायन्सेस, म्युझिक अ‍ॅण्ड फाइन आर्ट्स, सायन्स, सोशल सायन्सेस, टेक्नोलॉजी आणि ओपन लìनग आदी १६ विद्याशाखांमधून दिल्ली विद्यापीठामधील शैक्षणिक अभ्यासक्रम विभागण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या ८० हून अधिक विभागांमधून हे अभ्यासक्रम चालविले जातात. हे विद्यापीठ प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अशा सर्वच पातळ्यांवरील पाचशेहून अधिक निरनिराळे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या विभागांसोबत विद्यापीठाशी संलग्न असलेली सत्तरहून अधिक महाविद्यालयेही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विद्यापीठामध्ये आफ्रिकन स्टडिज, अ‍ॅनास्थेशिओलॉजी अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर, अप्लाइड सायन्सेस अ‍ॅण्ड ह्युमॅनिटीज, अरेबिक, आर्किटेक्चर अ‍ॅण्ड प्लॅिनग, आयुर्वेदिक अ‍ॅण्ड युनानी मेडिसिन, कम्युनिटी मेडिसिन, डेंटर सायन्सेस, इस्ट एशियन स्टडिज, इंजिनीअिरगच्या वेगवेगळ्या शाखा, फॉरेन्सिक मेडिसिन, जम्रेनिक अ‍ॅण्ड रोमान्स स्टडिज, मॉडर्न इंडियन लँग्वेजेस अ‍ॅण्ड लिटररी स्टडिज, ऑपरेशनल रिसर्च, पर्शिअन, पंजाबी आदी विषयांना वाहिलेले ८० हून अधिक विभाग चालतात.

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे तीन वेगवेगळ्या विभागांसह चालणारे अर्थशास्त्रविषयक प्रगत संशोधन आणि अध्ययन केंद्र या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी अग्रक्रमाचे अध्ययन केंद्र म्हणून विचारात घेतले जाते. विद्यापीठाने नव्याने सुरू केलेले दिल्ली स्कूल ऑफ जर्नालिझम पत्रकारितेच्या पाच वर्षांच्या एकत्रित अभ्यासक्रमासाठी सध्या ओळखले जात आहे. विद्यापीठाच्या आफ्रिकन स्टडिज विभागांतर्गत स्वाहिली भाषेमधील प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रमांसोबतच विद्यार्थ्यांना एम. फिल आणि पीएच.डी.चे संशोधनसुद्धा करता येणे शक्य आहे. बिझनेस इकॉनॉमिक्स विभागातून चालणारा बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयातील एमबीएचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम विद्यार्थी आणि उद्योग जगतासाठीसुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो आहे. ईस्ट एशियन स्टडिज विभागांतर्गत विद्यार्थ्यांना एम. ए. ईस्ट एशियन स्टडिज किंवा एम. ए. जॅपनिज हे दोन अभ्यासक्रम शिकता येतात. विद्यापीठाच्या लिंग्विस्टिक्स विभागामार्फत भाषाशास्त्रामधील एम.ए, एम. फिल आणि पीएच.डी.चे अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य आहे. याच विभागात अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन अप्लाइड लिंग्विस्टिक्स हा अभ्यासक्रमही चालविला जात आहे. जम्रेनिक अ‍ॅण्ड रोमान्स स्टडिज विभागामध्ये फ्रेंच, जर्मन, इटालियन या तीन भाषांमधून एम. ए. आणि एम. फिल.चे, तर जर्मन आणि इटालियन भाषेतून पीएच.डी.चे शिक्षण आणि संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. मॉडर्न इंडियन लँग्वेजेस अ‍ॅण्ड लिटररी स्टडिज हा विभाग बंगाली आणि तमिळ भाषेतील एम. ए., कम्पॅरेटिव्ह इंडियन लिटरेचर विषयातील एम. ए. आणि एम. फिलचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतो. याशिवाय विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर शिक्षण विभागामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन सायन्स अ‍ॅण्ड स्पोर्ट्स जर्नालिझम हा अभ्यासक्रम, बिझनेस जर्नालिझम आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन या विषयातील पदविका अभ्यासक्रम असे नानाविध अभ्यासक्रम विद्यार्थीवर्गाला करिअरच्या नानाविध संधी उपलब्ध करून देणारे ठरत आहेत.

borateys@gmail.com

First Published on May 29, 2018 2:07 am

Web Title: information about delhi university