आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस, कोल्हापूर

(सहभागी जिल्हे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा) सन्य भरती मेळावा दि. ८ डिसेंबर ते १८ डिसेंबर, २०१७ दरम्यान ‘छत्रपती शाहू डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ग्राऊंड, सातारा बस स्टँडजवळ आणि पोलीस परेड ग्राऊंड, सातारा येथे आयोजित करण्यात येत आहे. पुढील पदांची भरती –

१) सोल्जर (जनरल डय़ुटी)

पात्रता – १० वी किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण. उच्चशिक्षित उमेदवारांना गुणांची अट नाही. वयोमर्यादा – १७ १/२ ते २१ वष्रे.

२) सोल्जर (क्लर्क/स्टोअर किपर टेक्निकल) – १२ वी (आर्ट्स, सायन्स, कॉमर्स) किमान ६०% सरासरी गुणांसह. प्रत्येक विषयात किमान ५०% गुण आवश्यक. इंग्रजी/गणित/अकाऊंट्स/बुक कीिपग यापकी एक विषय आवश्यक. (१०वी किंवा १२वीला)

३) सोल्जर (टेक्निकल)

४) सोल्जर टेक्निकल एव्हिएशन अँड अ‍ॅम्युनिशन एक्झामिनर.

पद क्र. ३ व ४ साठी पात्रता -१२ वी (विज्ञान पीसीएम आणि इंग्रजी विषयात) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. प्रत्येक विषयात किमान ४०%  गुण आवश्यक.

५) सोल्जर टेड्समन – १०वी आयटीआय उत्तीर्ण (काही पदांसाठी ८ वी उत्तीर्ण पात्र).

६) धार्मिक शिक्षक (आरटीजेसीओ) ग्रुप एक्स – बी.ए., बीएस्सी, बीसीए. बीएड.

ग्रुप वाय् – बीएड पदवीची अट शिथिल.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. २२नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत. अ‍ॅडमिट कार्ड दि. २३ नोव्हेंबर, २०१७ नंतर डाऊनलोड करता येतील.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, रिफायनरीज् डिव्हिजन पुढील पदांची भरती.

१) बॉयलर ऑपरेशन्स इंजिनीअर – ३३ पदे.

पात्रता – बी.ई. (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) बॉयलर इंजिनीअर्स सर्टििफकेट (फर्स्ट क्लास प्रोफिशिअन्सी) एक वर्षांचा अनुभव.

२) क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स – ४४ पदे.

पात्रता – केमिस्ट्रीमधील पीएच्.डी.

(एम्.एस्सी.ला किमान ६०% गुण आवश्यक)

३) फायर अँड सेफ्टी ऑफिसर – ५० पदे.

पात्रता – बी.ई. (फायर/सेफ्टी अँड फायर इंजिनीअर) एक वर्षांचा अनुभव.

४) ुमन रिसोर्स ऑफिसर – ५० पदे.

पात्रता – एम.बी.ए. (एच्आर्) किंवा समतुल्य. दोन वर्षांचा अनुभव.

५) असिस्टंट िहदी ऑफिसर – १९ पदे.

पात्रता – एम.ए. (िहदी पदवीला एक विषय इंग्रजी असावा किंवा एम्.ए. (इंग्रजी पदवीला हायर िहदी विषय असावा. दोन वर्षांचा अनुभव. पद क्र. १, ३, ४, ५ साठी पदवी परीक्षेत किमान ६०% गुण आवश्यक. (अजा/अज – ५५% गुण)

(पद क्र. ५ साठी एम.ए. ला ६०% गुणांची अट लागू नाही.)

निवड पद्धती – पद क्र. १,२ आणि ३ साठी फक्त मुलाखत. पद क्र. ४ आणि ५ साठी लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची.

जनरल अ‍ॅप्टिटय़ूड आणि संबंधित विषयाचे ज्ञान  ग्रुप डिस्कशन मुलाखत.

वेतन – पद क्र. ५ साठी रु. १०लाख प्रतिवर्ष, इतर पदांसाठी रु. १२ लाख प्रतिवर्ष.

ऑनलाइन अर्ज www.iocl.com या संकेतस्थळावर दि. १८ नोव्हेंबर, २०१७.

ऑनलाइन अर्जाची िपट्रआऊट आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह स्वीकारण्याचा अंतिम दि. २५ नोव्हेंबर, २०१७.

लेखी परीक्षा (एचआर आणि िहदी ऑफिसरसाठी दि.१० डिसेंबर, २०१७)