जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, उरण, जि. रायगड येथे ट्रेड अ‍ॅप्रेंटिसची भरती.

अ‍ॅप्रेंटिसेस अ‍ॅक्ट, १९६१ अंतर्गत १ मार्च, २०१८ पासून १ वर्षांच्या प्रशिक्षणासाठी ६० ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेसची ही भरती होणार आहे.

१) वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिकल) – १० जागा.

पात्रता – आठवी पास. एक वर्षांचा आयटीआय कोर्स पूर्ण.

२) इलेक्ट्रिशियन – १२ जागा.

पात्रता – एसएससी उत्तीर्ण. २ वर्षांचा आयटीआय कोर्स पूर्ण.

३) फिटर – ८ जागा.

पात्रता – एसएससी उत्तीर्ण.

२ वर्षांचा आयटीआय कोर्स पूर्ण.

४) पासा (प्रोग्रॅिमग अ‍ॅण्ड सिस्टीम अ‍ॅडमिन असिस्टंट) (PASAA) – ३० जागा.

पात्रता – आयटीआयचा कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रॅिमग असिस्टंट (COAPA-NCVT) कोर्स पूर्ण.

कमाल वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी २१ वष्रेपर्यंत. (जेएनपीटी प्रकल्पबाधित – २४ वष्रे, अजा/अज – २६ वष्रेपर्यंत) जेएनपीटी प्रकल्पबाधितांना प्राधान्य दिले जाईल.

विद्यावेतन – प्रतिमाह – रु. ७,७५०/-

उमेदवारांनी आपले नाव रजिस्टर करताना १० वीच्या प्रमाणपत्रावर उल्लेखित केलेल्या नावाप्रमाणे रजिस्टर करावे. www.apprenticeship.gov.in या आरडीएटीच्या संकेतस्थळावर नाव रजिस्टर करून ऑनलाइन अर्ज दि. २२ जानेवारी, २०१८ पर्यंत करावेत.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या पुणे आस्थापनेवर गट-क पदांची भरती. (जाहिरात क्र. ०१/२०१८)

१) कनिष्ठ साठा अधीक्षक – २२ पदे. (१ पद अस्थिव्यंग प्रवर्गासाठी राखीव)

२) भांडारपाल – ६१ पदे. (१ पद अल्पदृष्टी आणि १ पद कर्णबधिर प्रवर्गासाठी राखीव)

पात्रता – पद क्र. (१) व (२) साठी शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी. एमएससीआयटी.

३) साहाय्यक – ११ पदे.

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील). एसएससीआयटी (बी.ई. (आयटी/ई अ‍ॅण्ड टीसी/कॉम्प्युटर) किंवा २ वर्षांची पदविका उत्तीर्ण असेल तर एमएससीआयटीची अट शिथिलक्षम).

वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी ३८ वष्रेपर्यंत. (मागासवर्गीयांसाठी ४३ वष्रेपर्यंत)

परीक्षा शुल्क – रु. २००/-.

निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा – मराठी, इंग्रजी,

सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता (कृषी, फलोत्पादन, साठवणूक, गोदाम व्यवस्थापन, केंद्र व राज्य सरकारची धोरणे, राज्य-राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी इ. विषयांवरील प्रश्नांचा समावेश) (२०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची). https://maharecruitment.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज   दि. ३० जानेवारी २०१८ पर्यंत करावेत.