भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीची संधी

ज्युनियर असोशिएट (कस्टमर सपोर्ट अ‍ॅण्ड सेल्स) एकूण ७,२०० (१,१०१ बॅकलॉग रिक्त पदे) पदांची भरती.

(जाहिरात क्र. CRPD/CR/2017-18/10)

राज्य निहाय स्थानिक भाषा/रिक्त पदांचा तपशील –

१) महाराष्ट्र – मराठी – एकूण ७३० पदे (जन – ३९५, अजा – ७३, अज – ६५, इमाव – १९७).

२) गोवा – कोंकणी – एकूण – २० पदे (जन – १५, अज – २, इमाव – ३).

३) तेलंगणा – तेलगू/उर्दू/िहदी – एकूण ११०  अजासाठी १४५ बॅकलॉग व्हेकन्सीज (जन – ५७, अजा -१७, अज – ७, इमाव – २९).

४) आंध्र प्रदेश – तेलुगू/उर्दू/िहदी – एकूण ४०० पदे (जन – २००, अजा – ६४, अज – २८, इमाव – १०८)

५) गुजरात – गुजराती – एकूण ५०० पदे (जन -२५५, अजा – ३५, अज – ७५, इमाव – १३५) इत्यादी.

पात्रता – दि. १ जानेवारी २०१८ रोजी पदवी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील.)

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी २० ते २८ वष्रे. (कमाल वयोमर्यादा इमाव – ३१ वष्रेपर्यंत, अजा/अज – ३३ वष्रेपर्यंत, विकलांग – ३८/४१/४३ वष्रेपर्यंत.)

निवड पद्धती –  फेज-१ऑनलाइन प्रीलिमिनरी एक्झाम – मार्च/एप्रिल २०१८ मध्ये होईल. (१०० गुण / १०० प्रश्न) कालावधी – १ तास ३ सेक्शन. इंग्लिश लँग्वेज – ३० गुण, न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – ३५ गुण, रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ गुण. प्रत्येकी २०मिनिटे.

फेज-२ मुख्य परीक्षा (ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाइप) एकूण १९० प्रश्न, २०० गुण. कालावधी – २ तास, ४० मिनिटे. ४ सेक्शन – जनरल/फायनान्शियल अवेअरनेस -( ५० प्रश्न / ५० गुण – ३५ मिनिटे),  जनरल इंग्लिश – (४० प्रश्न / ४० गुण – ३५ मिनिटे).  क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड -(५० गुण/५० प्रश्न – ४५ मिनिटे), रिझिनग अ‍ॅबिलिटी अ‍ॅण्ड कॉम्प्युटर ऑप्टिटय़ूड (५० प्रश्न/ ६० गुण – ४५ मिनिटे) स्थानिय भाषेवर आधारित टेस्टमध्ये अनुत्तीर्ण होणारे उमेदवार निवडीसाठी अपात्र ठरतील. जे उमेदवार मुख्य परीक्षा पास करतील आणि ज्यांच्याकडे दहावी/बारावीला दिलेल्या स्थानिय भाषेत उत्तीर्ण असतील त्यांना ही टेस्ट द्यावी लागणार नाही.

दरमहा वेतन रु. २३,६००/- असेल.

परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, रत्नागिरी, सांगली, सातारा. गोव्यातील – पणजी, वेरणा.

परीक्षा शुल्क – रु. ६००/- ऑनलाइन मोडने. (अजा/अज/विकलांग/माजी सनिक – रु. १००/-). ऑनलाइन अर्ज  https://bank.sbi.careers किंवा  https://www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

मुंबई, नागपूर, पणजी इ. केंद्रांवर अजा/अज/माजी सनिक/अल्पसंख्याक उमेदवार सशुल्क प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठी अर्ज करताना नोंद करू शकतात.

मॅनेजर/ (MMGS IIIएकूण ७६ पदे)/चिफ मॅनेजर SMGS-IV-(एकूण ४५ पदे) एकूण १२१.

स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्स पदांची भरती. (जाहिरात क्र. उफढऊ/रउड/2017-18/07 )

१) मॅनेजर (क्रेडिट अ‍ॅनालिस्ट (बिझनेस डेव्हलपमेंट)) – ५३ पदे.

२) चीफ मॅनेजर (क्रेडिट अ‍ॅनालिस्ट/बिझनेस डेव्हलपमेंट) – ३५ पदे.

पात्रता पद क्र. (१) व (२) साठी – एमबीए/पीजीडीएम/सीए.

३) मॅनेजर (अ‍ॅसेट मॅनेजमेंट/डिजिटल मार्केटिंग/अ‍ॅग्री बिझनेस/मार्केटिंग र्मचट बिझनेस एचएनआय बँकिंग) – २० पदे.

४) चीफ मॅनेजर (अ‍ॅसेट मॅनेजमेंट/अ‍ॅग्री बिझनेस/ डेबिट कार्ड/डिजिटल बँक) – ९ पदे.

पात्रता पद क्र. (३) व (४) साठी – एमबीए किंवा तत्सम.

५) इतर – ४ पदे. (मॅनेजर पदासाठी ५ वर्षांचा आणि चीफ मॅनेजर पदासाठी ८ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.)

वयोमर्यादा – दि. ३० जून २०१८ रोजी मॅनेजर पदासाठी २५ ते ३५वष्रे. चीफ मॅनेजर पदांसाठी २५ ते ३८ वष्रे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रे, विकलांग – १०/१३/१५ वष्रे) वेतन – सीटीसी प्रतिवर्ष – मॅनेजर पदांसाठी रु. १८ लाख, चिफ मॅनेजर पदांसाठी – २२ लाख.

निवड पद्धती – निवड शॉर्ट लििस्टग आणि पर्सोनल इंटरह्य़ूवर आधारित.

ऑनलाइन अर्ज https://www.sbi.co.in/careers किंवा  https://bank.sbi/careers या संकेतस्थळावर ४ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

इंडियन आर्मीमध्ये सामील होण्यासाठी एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम – ४४ वा कोर्स ऑक्टोबर, २०१८.

पात्रता – (अ) एनसीसी ‘सी’ सर्टििफकेट परीक्षेत किमान ‘बी’ ग्रेड. (ब) किमान सरासरी ५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण. (क) एनसीसीच्या सीनियर डिव्हिजन/िवगमध्ये किमान दोन वर्षांची सेवा.

वयोमर्यादा – दि. १ जुल, २०१८ रोजी १९ ते २५ वष्रेपर्यंत (जन्म २ जुल, १९९३ ते १ जुल, १९९९ दरम्यानचा) असावा.

रिक्त पद संख्या –  ल्ल  एनसीसी (पुरुष) – ५० जागा (५ जागा युद्धात कामी आलेल्या आर्मी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव.)  ल्ल एनसीसी (विमेन) – ५ जागा (१ जागा युद्धात कामी आलेल्या आर्मी कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी राखीव.)

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी (OTA), चेन्नई येथे ४९ आठवडय़ांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान प्रतिमाह स्टायपेंड रु. ५६,१००/- दिले जाईल. कॅडेट्सना ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर लेफ्टनंट पदावर (रु.५६,१००/- १,७७,५००/-)

पे-मॅट्रिक्स लेव्हल – १० वर तनात केले जाईल.

निवड पद्धती – शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीसाठी सेंटर ई-मेल/ एसएमएसद्वारा सूचित केले जाईल. उमेदवारांना संकेतस्थळावर लॉगइन करून एसएसबी मुलाखतीची तारीख निश्चित करून घ्यावी लागेल. शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७.५ सें.मी. आणि उंचीच्या प्रमाणात वजन. उंची – महिला – १५२ सें.मी., वजन – ४२ कि. ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर (Officers Entry- Apply/login – Registration) दि. ८ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com