नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड), मुंबई (जाहिरात क्र. ४/ग्रेड-ए/२०१७-१८) असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए (आरडीबीएस)च्या एकूण ९२ पदांची भरती.

(४ पदे विकलांगांसाठी राखीव) (जनरल – ४६ पदे, अ‍ॅनिमल हजबंडरी – ५पदे, चार्टर्ड अकाऊंटंट – ५ पदे, इकॉनॉमिक्स – ९ पदे, फॉरेस्ट्री, अ‍ॅग्रिकल्चरल, सोशल वर्क इ.)

पात्रता – असिस्टंट मॅनेजर (जनरल) – पदवी किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/विकलांग – ४५%).

इतर पदांसाठी पात्रता – संबंधित विषयातील पदवी किमान ५०% गुण.

वयोमर्यादा – १ मार्च, २०१८ रोजी २१ ते ३० वष्रेपर्यंत (इमाव – ३३, अजा/अज – ३५, विकलांग – ४०/४३/४५ वष्रेपर्यंत.)

परीक्षा पूर्व प्रशिक्षण – अजा/अज/इमाव/विकलांग उमेदवारांना विनामूल्य परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी चिफ जनरल मॅनेजर, नाबार्ड यांना वेगळा अर्ज दि. १६ एप्रिल, २०१८ पर्यंत करावा.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, सातारा, रत्नागिरी इ.

परीक्षा शुल्क –

(रु.६५०) + ( रु.१५०)  =  ८००/- रुपये

(अजा/अज/विकलांग रु. १५०/-)

वेतन – दरमहा रु. ६१,०००/-

ऑनलाइन अर्ज www.nabard.org या संकेतस्थळावर २ एप्रिल २०१८पर्यंत करावेत.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), पवई, मुंबई (जाहिरात क्र. आरईसीटी/एडीएमएन-कक/ २०१७/१६) पुढील पदांची भरती.

१) सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (३ वर्षांसाठी नेमणूक) – ३ पदे (इमाव – १, यूआर – २)

वेतन – रु. ३०,०००/- ते ४२,०००/-

पात्रता – बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन अँड इंजिनीअिरग) किंवा एमएस्सी (कॉम्प्युटर सायन्स/आयटी किंवा एमसीए अधिक १ वर्षांचा अनुभव किंवा बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स/आयटी) अधिक २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – ३२ वष्रेपर्यंत.

२) क्लेरिकल असिस्टंट (३ वर्षांसाठी नेमणूक) २ पदे. (अजा – १, यूआर – १)

पात्रता – पदवी अधिक कॉम्प्युटर ऑफिस अ‍ॅप्लिकेशनचे ज्ञान.

वयोमर्यादा – २७  वष्रेपर्यंत.

वेतन – रु. १८,०००/- ते रु. २६,०००/-

३) ज्युनियर डिझाइन असिस्टंट – (तीन वर्षांसाठी नेमणूक) – २ पदे (इमाव – १, यूआर – १)

४) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (हॉस्पिटॅलिटी सुपरवायजर) – १ पद.

५) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट – १ पद.

६) मार्केटिंग असिस्टंट – १ पद.

७) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (हॉस्पिटॅलिटी असिस्टंट सुपरवायजर) – २ पदे.

विस्तृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज http://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment वर उपलब्ध आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल, २०१८.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती.

लायब्रेरियन, असिस्टंट लायब्ररियन, िप्रसिपल टेक्निकल ऑफिसर, सीनियर टेक्निकल ऑफिसर, टेक्निकल ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन, डेप्युटी रजिस्ट्रार, नर्स (मेल) आणि ज्युनियर असिस्टंट (मल्टि स्किल).

विस्तृत माहिती आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.iiserpune.ac.in या संकेतस्थळावर जावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०१८ आहे.

suhassitaram@yahoo.com